Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बर्फ वितळताच तरंगू लागतात शेकडो मानवी सांगाडे! हिमालयातील महाभयंकर रहस्य!

उत्तराखंडमधील १६,५०० फूट उंचीवर असलेला 'रूपकुंड' तलाव तिथल्या शेकडो प्राचीन मानवी सांगाड्यांमुळे जगासाठी एक मोठे कोडे बनला आहे. एका भयंकर गारपिटीमुळे हे मृत्यू झाल्याचे विज्ञानाने सिद्ध केले असले, तरी तिथे भूमध्य समुद्रातील लोकांचे सांगाडे कसे आले, याचे रहस्य आजही कायम आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 19, 2026 | 08:13 PM
बर्फ वितळताच तरंगू लागतात शेकडो मानवी सांगाडे! हिमालयातील महाभयंकर रहस्य!
Follow Us
Follow Us:

निसर्गाचे सौंदर्य जितके विलोभनीय असते, तितकेच त्याचे काही पैलू थरकाप उडवणारे असतात. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे उत्तराखंडमधील हिमालयाच्या कुशीत, तब्बल १६,५०० फूट उंचीवर असलेला ‘रूपकुंड तलाव’ या तलावाला जगभरात ‘कंकालांचा तलाव’ म्हणून ओळखले जाते. वर्षातील बहुतांश काळ बर्फाच्छादित असणाऱ्या या तलावाचा बर्फ जेव्हा उन्हाळ्यात वितळतो, तेव्हा तलावाच्या तळाशी आणि काठावर शेकडो मानवी सांगाडे, कवटी आणि हाडे तरंगताना दिसतात. हे भयानक दृश्य कोणाचाही थरकाप उडवू शकते.

राजा, राणी आणि सैनिकांची लोककथा

या सांगाड्यांमागे स्थानिक लोकांमध्ये एक जुनी कथा प्रसिद्ध आहे. नवव्या शतकात कनौजचे राजा जशधवल हे त्यांच्या गरोदर राणीसह आणि सैनिकांच्या लवाजम्यासह ‘नंदा देवी’च्या यात्रेसाठी निघाले होते. यात्रेदरम्यान राजाने गाण्याबजावण्याचे नियम मोडल्यामुळे स्थानिक देवता नंदा देवी कोपली. अचानक आलेल्या भयंकर वादळात आणि गारपिटीत राजा, राणी आणि त्यांचे संपूर्ण सैन्य या तलावात गाडले गेले, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे.

हंपीला फिरायला जाताय? ही आहे हंपीमध्ये फिरण्यासारखी 10 बेस्ट ठिकाणे! आत्ताच पाहून घ्या

विज्ञानाला पडलेले कोडे

१९४२ मध्ये एका फॉरेस्ट गार्डने या तलावाचा शोध लावला. तेव्हापासून आजपर्यंत जगभरातील शास्त्रज्ञांनी यावर अनेक संशोधने केली आहेत, पण प्रत्येक संशोधनासोबत हे रहस्य अधिकच गडद होत गेले:

भयंकर गारपीट: डीएनए  चाचण्यांवरून असे दिसून आले की, हे सांगाडे ८५0 ईसवी सन पूर्व काळातील आहेत. त्यांच्या कवटीवर झालेल्या जखमांवरून असे समोर आले की, क्रिकेटच्या चेंडूएवढ्या मोठ्या गारा अंगावर पडल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला असावा. हिमालयाच्या उघड्या पठारावर लपायला जागा न मिळाल्याने हे सगळे एकाच वेळी मारले गेले.

कर्नाटकातील बदामी मधील ही आहेत 10 पर्यटन स्थळे! आत्ताच पाहून घ्या

सर्वात धक्कादायक खुलासा २०१९ च्या संशोधनात झाला. हाडांच्या रचनेवरून कळाले की, हे सर्व लोक एकाच काळातील आणि एकाच ठिकाणचे नव्हते. यात काही लोक भारतीय वंशाचे होते, तर काही लोकांचे डीएनए थेट भूमध्य समुद्रातील (Mediterranean) ग्रीस देशातील लोकांशी जुळणारे होते, जे तिथे शेकडो वर्षांनंतर आले होते.

थरारक पर्यटनाचे केंद्र

हे लोक कोण होते? ग्रीसचे लोक हिमालयातील एवढ्या दुर्गम भागात काय करत होते? या प्रश्नांची अचूक उत्तरे विज्ञानाकडेही नाहीत. आज हे रहस्यमयी रूपकुंड ट्रेकर्स आणि शास्त्रज्ञांसाठी आकर्षणाचे मोठे केंद्र बनले आहे. निसर्गाचा कोप आणि इतिहासाचे गडद गूढ सोबत घेऊन हा तलाव आजही हिमालयाच्या कुशीत शांत उभा आहे.

Web Title: Lake of skeltons rupkand lake of uttarakhand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 08:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.