Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

170 खोल्या, 350 कोटी किंमत; भारतातील ऐश्वर्यशाली जीवनशैलीची प्रतिमा असेलला ‘हा’ राजवाडा तुम्ही पहिला आहे का?

Laxmi Vilas Palace Vadodara : लक्ष्मी विलास पॅलेस गुजरातमधील वडोदरा येथे आहे, जो जगातील सर्वात मोठे घर किंवा राजवाडा म्हणून ओळखला जातो. या लेखाद्वारे राजवाड्याबद्दल जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 22, 2025 | 03:30 PM
Laxmi Vilas Palace Vadodara The world's largest palace in India

Laxmi Vilas Palace Vadodara The world's largest palace in India

Follow Us
Close
Follow Us:

Laxmi Vilas Palace Vadodara : गुजरातमधील वडोदरा शहरात असलेला लक्ष्मी विलास पॅलेस हे केवळ भारतच नव्हे, तर जगातील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानांपैकी एक आहे. या राजवाड्यात सुमारे १७० खोल्या, भव्य बागा, हॉल्स, आणि गोल्फ कोर्ससह अनेक आकर्षक जागा आहेत. आजही या महालात फक्त ५ लोक राहतात, आणि त्याची बाजारातील किंमत अंदाजे ३५० कोटी रुपये आहे.

राजवाड्याचा इतिहास

लक्ष्मी विलास पॅलेस हे गायकवाड घराण्याचे आहे, जे १८व्या शतकापासून वडोदरा संस्थानावर राज्य करत होते. या राजवाड्यात ४ गायकवाड महाराजांचे राज्याभिषेक झाले आहेत. महाराजा समरजीत सिंह रणजीत सिंह गायकवाड यांचा शेवटचा राज्याभिषेक २०१२ मध्ये येथे झाला. पूर्वी हे राजवाडे लोकांसाठी बंद होते, पण आता महाराजा आणि महाराणी यांनी ते सामान्य जनतासाठी खुलं केलं आहे.

हे देखील वाचा : Travel Hacks : प्रवास करताना घोटाळ्यांपासून सावध! बनावट गाईड, महाग टॅक्सी आणि फसवी हॉटेल बुकिंग टाळण्यासाठी सोपे उपाय

राजवाड्याची वास्तुकला आणि वैशिष्ट्ये

लक्ष्मी विलास पॅलेसची वास्तुकला इंडो-सारासेनिक शैलीत आहे. या महालाची रचना इतकी भव्य आहे की बकिंगहॅम पॅलेसच्या चार पट मोठा आहे. पॅलेसमध्ये फक्त खोल्या नव्हेत तर दरबार हॉल, रॉयल गार्डन्स, तलाव, आणि १०-होल गोल्फ कोर्सदेखील आहे. दरबार हॉल इतका विशाल आहे की हजारो लोक एकाच वेळी येथे बसू शकतात.

महालाचे बांधकाम

हा राजवाडा महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी १८९० मध्ये बांधला. रॉयल डिझाइनचे काम ब्रिटिश वास्तुविशारद मेजर चार्ल्स मंट यांनी सुरु केले, पण त्यांचे निधन झाल्यानंतर काम रॉबर्ट फेलोज चिशोल्म यांच्याकडे सोपवण्यात आले. सुरुवातीला या महालाच्या गणितांमध्ये चुका आल्याने तो कोसळण्याची भीती होती. अखेर या भव्य महालाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.

राजवाड्यात राहणारे लोक

आजही गायकवाड कुटुंब लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहते. महाराजा समरजीत सिंह रणजीत सिंह गायकवाड, त्यांची पत्नी आणि दोन मुली पद्मराजे व नारायणराजे तसेच राणी माता महाराणी शुभांगी राजे येथे वास्तव्य करतात. या विशाल महालात फक्त ५ लोक राहतात.

पर्यटकांसाठी आकर्षणे

  • दरबार हॉल: भव्य छत, इटालियन मोजेक, स्टँड ग्लासेस, आणि शाही संगीत मैफिलीचे आयोजन.
  • रॉयल संग्रहालय: राजघराण्याची ऐतिहासिक वस्तू, चित्रे, शस्त्रे आणि पुतळे पाहता येतात.
  • गोल्फ कोर्स: राजघराण्यासाठी खास बांधलेला १०-होलचा गोल्फ कोर्स.
  • रॉयल गार्डन्स आणि तलाव: फोटोशूटसाठी आदर्श ठिकाण.
  • मार्गदर्शित टूर: राजवाड्याच्या बहुतेक भागांना पर्यटक भेट देऊ शकतात.

तिकीट व भेटीची माहिती

  • वेळ: सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५. सोमवारी बंद.
  • तिकीट किंमत: २५० ते ३०० रुपये (ऑडिओ गाइडसह).
  • फोटोग्राफी: वेगळा शुल्क आकारला जातो.
  • स्थान: वडोदरा शहराच्या मध्यभागी, रेल्वे स्टेशनपासून ३–४ किमी, विमानतळापासून ६ किमी अंतर.

हे देखील वाचा : VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल

लक्ष्मी विलास पॅलेस हे ऐतिहासिक, भव्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या अप्रतिम ठिकाण आहे. भारतातील आणि जगातील सर्वात मोठ्या राजवाड्यांपैकी एक म्हणून, हे प्रत्येक इतिहासप्रेमी आणि वास्तुकलेप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे.

Web Title: Laxmi vilas palace vadodara the worlds largest palace in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

International Day of Persons with Disabilities : 3 डिसेंबर का आहे इतका महत्त्वाचा? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे महत्त्व
1

International Day of Persons with Disabilities : 3 डिसेंबर का आहे इतका महत्त्वाचा? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे महत्त्व

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश
2

World AIDS Day 2025 : दरवर्षी 1 डिसेंबरलाच जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि उद्देश

Chemical Warfare Remembrance Day : विज्ञानाचा वापर विध्वंसासाठी नव्हे, तर कल्याणासाठी व्हावा याची आठवण करून देणारा ‘हा’ दिवस
3

Chemical Warfare Remembrance Day : विज्ञानाचा वापर विध्वंसासाठी नव्हे, तर कल्याणासाठी व्हावा याची आठवण करून देणारा ‘हा’ दिवस

Saint Lucia : कॅरिबियनचा स्वर्ग! जगातील एकमेव ‘देश’ ज्याचे नाव एका महिलेच्या नावावर आहे; सौंदर्य आणि इतिहासाचा संगम
4

Saint Lucia : कॅरिबियनचा स्वर्ग! जगातील एकमेव ‘देश’ ज्याचे नाव एका महिलेच्या नावावर आहे; सौंदर्य आणि इतिहासाचा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.