Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : धनंजय माने अर्थात अशोक मामांचा वाढदिवस; जाणून घ्या 04 जूनचा इतिहास

मराठी चित्रपटसृष्टी एका वेगळ्याच उंचीवर नेणारे अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. अशोक सराफ यांनी अडीशेहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 04, 2025 | 05:44 PM
Marathi actor Ashok Saraf's birthday 04 June History dinvishesh

Marathi actor Ashok Saraf's birthday 04 June History dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

प्रेक्षकांना आपल्या निखळ मनोरंजनाने पोट धरुन हसायला लावणारे विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस आहे. अशोक सराफ यांना मामा म्हणून संबोधले जाते. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी धुव्र ताऱ्याप्रमाणे स्थान मिळवले आहे. अशोक सराफ यांच्या धनंजय माने, प्रोफेसर धोंड अशा अनेक भूमिका अजरामर ठरल्या आहेत. अशोक सराफ यांनी 100 हून अधिक व्यवसायिक नाटके आणि 250 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या दशकांच्या अभिनय क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल अशोक सराफ यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

04 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1674 : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले.
  • 1876 : ट्रान्सकॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वेमार्ग ही युनायटेड स्टेट्सच्या दोन किनार्यांना जोडणारी पहिली प्रवासी ट्रेन होती.
  • 1878 : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंगडमला दिले.
  • 1896 : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी रोम जिंकला.
  • 1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1979 : घानामध्ये लष्करी उठाव.
  • 1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने 8 डावात 7 शतकांचा नवा विक्रम केला.
  • 1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • 1997 : इन्सॅट-2डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कौरो येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
  • 2001 : नेपाळचा शेवटचा राजा ज्ञानेंद्र सिंहासनावर बसला.
  • 2010 : स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट पहिले उड्डाण.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

04 जून जन्म दिनविशेष

  • 1738 : इंग्लंडचा राजा  जॉर्ज (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1820)
  • 1904 : भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992)
  • 1910 : होव्हर्क्राफ्टचे शोधक ख्रिस्तोफर कॉकेरेल्म यांचा जन्म. (मृत्यू: 1 जुन 1999)
  • 1915 : माली देशाचे पहिले अध्यक्ष मालिबो केएटा यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1977)
  • 1936 : चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1991)
  • 1946 : दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्म.
  • 1947 :  विनोदी अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा जन्मदिवस.
  • 1959 : भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा जन्म.
  • 1974 : भारतीय शेफ ‘जॅकब सहाय्या कुमार अरुनी’ यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 2012)
  • 1975 : अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा जन्म.
  • 1990 : भूतानची राणी जेत्सुनपेमा वांग्चुक  यांचा जन्म.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

04 जून मृत्यू दिन विशेष

  • 1947 : बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1876)
  • 1962 : अमेरिकन निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब यांचे निधन.
  • 1998 : इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.
  • 1998 : मराठी साहित्यिक गोविंद वासुदेव कानिटकर यांचे निधन.
  • 2020 : भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बासु चटर्जी यांचे निधन

Web Title: Marathi actor ashok sarafs birthday 04 june history dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास
1

Dinvishesh : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती; जाणून घ्या 11 फेब्रुवारीचा इतिहास

Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ;  विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप
2

Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ; विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप

SPPU : अविरत ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना; जाणून घ्या 10 फेब्रुवारीचा इतिहास
3

SPPU : अविरत ज्ञानगंगा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना; जाणून घ्या 10 फेब्रुवारीचा इतिहास

कुष्ठरोग्यांसाठी मायेचा हात देणाऱ्या बाबा आमटे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 फेब्रुवारीचा इतिहास
4

कुष्ठरोग्यांसाठी मायेचा हात देणाऱ्या बाबा आमटे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 फेब्रुवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.