ओडिशाचे दांडू मा मंदिर
शारदीय नवरात्रीच्या पवित्र सणाला 3 ऑक्टोबर पासून सुरूवात झालेली आहे. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण जे अश्विन महिन्यात साजरा करण्यात येतो. हा सण नऊ दिवस असतो. यावेळी दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसांत लोक 9 दिवसांचे व्रतही करतात. याशिवाय या 9 दिवसांमध्ये देवीच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी जमते. आपल्या भारतात अनेक मंदिरे आहेत. ज्यांचे स्वतःचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे.
असेच एक मंदिर ओडिशामध्ये देखील आहे. हे मंदिर अनेक कारणांसाठी अद्वितीय मानले जाते. ओडिशामध्ये एक प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर आहे. पण याचशिवाय दुर्गा मातेचे देखील एक अनोखे मंदिर आहे. मात्र ओडिशामधील दुर्गा मातेचे हे मंदिर फक्त नवरात्रीच्या दिवसांतच उघडले जाते. हे मंदिर गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी येथे आहे. हे अक अगदी छोटेसे दुर्गा मंदिर आहे. या मंदिराबद्दल फार कमी लोकांनी माहिती आहे. आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने या अनोख्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात हे दुर्गा मातेचे छोटेसे मंदिर 9 दिवसच का उघडते.
वर्षभर मंदिराचा दरवाजा का बंद असतो?
ओडिशाचे या मंदिराबद्दल जास्त लोकांना माहित नाही. हेमंदिर केवळ नऊ दिवस नवरात्रीच्या दिवसांमध्ये उघडते. ओडिशामध्ये हे मंदिर दांडू माँ नावाने ओळखले जाते. हे खूप जुने मंदिर आहे, ज्याला नवरात्रीच्या वेळी ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील लोक मोठ्या संख्येने भेट देतात. हे मंदिर इतर मंदिराप्रमाणे वर्षभर बंद असते. कारण येखील लोकांचे म्हणणे आहे की, ही परंपरा अज्ञात काळापासून सुरू आहे आणि यामगचे कारणही अद्याप कोणाला माहित नाही.
हे मंदिर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उघडले जाते. यानंतर, येथे अनेक विधी होतात, जे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत चालू असतात. मग नवरात्री संपल्यानंतर मातीच्या भांड्यात नारळाच्या प्रसादाबरोबरच मंदिराचा दरवाजा पुढील वर्षाच्या नवरात्रीपर्यंत बंद केला जातो. विशेष बाब म्हणजे मंदिराचा दरवाजा पुन्हा उघडल्यावर तेथील प्रसाद तसाच असतो, जो नवरात्रीच्या काळात मंदिरात येणाऱ्या भाविकांना दिला जातो.
लाखो भाविक भेट देण्यासाठी येतात
ओडिशा शहरामध्ये अनेक प्राचीन मंदिरापैकी असलेल्या या दुर्गा मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देण्यासाठी नवरात्रीच्या दिवसांमध्ये येतात. हे मंहिर ओडिशा शहराचे सांस्कृतिक सौंदर्य बनले आहे. वर्षातील नवरात्र ही एकच वेळ आहे जेव्हा भक्त मातेचे दर्शन घेऊ शकतात, ज्याला तेलुगुमध्ये दंडमरम्मा आणि ओरियामध्ये दांडू मा असे म्हणतात. या शहरातील, परलाखेमुंडी किंवा परळा ही 1885 मध्ये स्थापन झालेली ओडिशातील सर्वात जुन्या नगरपालिकांपैकी एक आहे. या शहरातील लोक बहुतेक तेलुगू आणि ओरिया भाषेत बोलतात आणि या ठिकाणाची सीमा आंध्र प्रदेशला लागून आहे.