गोकुळाष्टमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा 'या' भक्तिमय शुभेच्छा
हिंदू धर्मात गोकुळाष्टमी सणाला विशेष महत्व आहे. यादिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला होता. हा उत्सव भगवान विष्णूंचा आठवा अवतार, श्रीकृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. कृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला होता,म्हणून या दिवसाला ‘जन्माष्टमी’ म्हणून ओळखले जाते. आज संपूर्ण राज्यभरात गोकुळाष्टीमीचा मोठा आनंद आणि उत्साह आहे. याशिवाय घरात कृष्णाच्या नैवेद्यासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. याशिवाय महाराष्ट्रामध्ये दहीहंडी उत्सवाचे सुद्धा आयोजन केले जाते. कृष्णाने जगाला प्रेम, शांती आणि न्यायाचा संदेश दिला.म्हणूनच आज आम्ही गोकुळाष्टमी निमित्त कृष्ण भक्तांना देण्यासाठी काही खास शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं खूप जास्त आनंद होईल. (फोटो सौजन्य – istock)
मुरलीच्या सुरांत गोडवा दाटो,
कान्हाच्या नामात जीवन फुलतो,
जन्माष्टमीच्या मंगल क्षणी,
प्रेम, शांती, आनंद मनात नांदो.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
कान्हाच्या गोड हास्यातून,
सारे दुःख विसरून जावं,
जन्माष्टमीच्या शुभ दिवशी,
भक्तीने जीवन उजळून जावं.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
राधेच्या प्रेमात, मुरलीच्या स्वरात,
कान्हा राहो हृदयाच्या दरवाजात,
जन्माष्टमीच्या मंगल दिवशी,
सुख-समृद्धी नांदो आपल्या संसारात.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
माखनचोराचा गोड गोंधळ,
गोकुळात भरला आनंदाचा जल्लोष,
जन्माष्टमीच्या पावन क्षणी,
तुमचं जीवन होवो सुखमय, प्रकाशमय.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रीकृष्णाचा नाद मनात घोळो,
राधेच्या प्रेमाचा सुवास पसरू दे,
जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या,
घरात सदैव आनंद नांदू दे.
गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
कान्हाची कृपा लाभो,
जीवनात सुखाची सर बरसो,
जन्माष्टमीच्या शुभ दिवशी,
आयुष्य फुलांच्या गंधाने भरून जाओ.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
समुरलीच्या स्वरात शांती,
कान्हाच्या कृपेतमाधान,
जन्माष्टमीच्या मंगल क्षणी,
सर्वांना लाभो सुख-शांतीचं वरदान.
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
गोपाळाच्या पावलांचा गोड ठसा,
जीवनात नेहमी राहो असा,
जन्माष्टमीच्या शुभक्षणी,
आशीर्वाद लाभो अपार कृपेचा.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
कान्हा येवो स्वप्नांतून हसत,
आणो जीवनात नवा प्रकाश,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा,
प्रेम, भक्ती आणि आनंदासह खास.
गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Janmashtami: जन्माष्टमीला मोरपंख चमकवेल तुमचे नशीब, जाणून घ्या फायदे आणि उपाय
गोकुळाच्या गल्लीतील नाद,
राधेच्या गाण्याचा गोड गंध,
जन्माष्टमीच्या पावन दिवशी,
तुमचं आयुष्य होवो आनंदमय आणि सुंदर.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!