
PM Indira Gandhi death anniversary assassinated by Sikh bodyguard after Operation Blue Star
Indira Gandhi Death Anniversary: भारताच्या सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या महिला पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी. भारताच्या पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. सकाळी 9:30 वाजता त्यांच्या सफदरजंग रोड , नवी दिल्ली येथील निवासस्थानी हत्या करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या शीख अंगरक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर त्यांचे अंगरक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली.पाच फूटांवर सतवंतसिंग टॉमसन ऑटोमॅटिक कार्बाइन गन घेऊन उभा होता. इंदिरा गांधी यांच्यावर तब्बल 25 गोळ्या झाडण्यात आल्या. आजही पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा आणि त्यांचे निर्णय कोणीही विसरु शकलेले नाही.
31 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
31 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
31 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष