• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Shravan Special Pashan Swayambhu Someshwar Temple At Pune Where Gold Treasure Found

श्रावण विशेष: सोन्याचा खजिना सापडलेले; पाषाण येथील स्वयंभू सोमेश्वर मंदिर

श्रावणामध्ये पूजा करण्यासाठी अनेक शिव मंदिर आहेत. पुणे शहराच्या जवळ असलेल्या पाषाण येथील सोमेश्वरवाडी येथे सोमेश्वर महादेवाचे जुने मंदिर आहे. 900 वर्षांपासून अस्तिवामध्ये असलेल्या या मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. एकेकाळी सोने सापडलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 01, 2024 | 03:55 PM
Someshwar Mahadev Pashan Mandir

फोटो - सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रिती माने :  पुण्याच्या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरं आजही आपली ओळख जपून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शहराच्या जवळ असणाऱ्या पाषाणमधील सोमेश्वर महादेव मंदिर. सोमेश्वरवाडीमध्ये असणारे सोमेश्वर मंदिर भव्य परिसर, सुबक नक्षीकाम आणि स्वयंभू शिवलिंग यासाठी ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी देखील येथील शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे, अशी मान्यता आहे.

सोमेश्वर महादेव मंदिर सुमारे 900 वर्षांपूर्वी पासून मुळा नदीची उपनदी असलेल्या रामनदीच्या काठावर आहे. या मंदिराचा शिवरायांपासून पेशव्यांच्या इतिहासापर्यंत उल्लेख आहे. पेशावाईच्या काळात या मंदिरामध्ये सोन्याचा खजिना सापडला होता. मराठ्यांचे आध्यात्मिक उपदेशक शिवरामभट चित्रस्वामी यांना मंदिराच्या आवारात पुरलेले सोन्याच्या पेशव्यांकडे दिले. पेशव्यांनी देखील या सोन्याचा उपयोग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी केला. या मंदिराचे स्थापत्यामध्ये या प्रत्यय येतो. पेशव्यांकडून बांधण्यात आलेल्या ओंकारेश्वर मंदिर आणि या सोमेश्वर मंदिराच्या बांधकामामध्ये साम्य दिसून येते.

मंदिराचा परिसर भव्य असून साडेतीन एकरांचा आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वार आहे. मंदिराला गडकोटप्रमाणे तटबंदी आहे. मुख्य दगडी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर मंदिराचा प्रसन्न करणारा भव्य परिसर दिसून येतो. प्रवेश केल्यानंतर अगदी समोर डोलेजंग अशी दीपमाळ दिसते. त्याची उंची तब्बल 40 फूट आहे. त्याखाली गणराय आणि हनुमानाची छोटीखानी देऊळं आहेत. त्याचबरोबर काही ‘स्मरणशिळा’ देखील आहेत.

सोमेश्वर मंदिर हे मुळा नदीची उपनदी असलेल्या राम नदीच्या किनारी हे मंदिर उभारण्यात आले आहे. सध्या मात्र ही नदी नसून तिला नाल्याचे स्वरुप आले आहे. सोमेश्वर मंदिराच्या मागे कुंड देखील बांधण्यात आलेले आहे. या दगडी कुंडाला सुंदर अशा दगडी पायऱ्या आहेत. नदीत दगडी किंवा लाकडी पाचरी मारून पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे हे जलाशय तयार झाले आहे. या जलाशयामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

दगडी बांधकाम असलेल्या सोमेश्वर मंदिरावर सुबक नक्षीकाम करण्यात आले आहे. फुलांच्या आणि पानांचे कोरीवकाम करण्यात आले आहे. मंदिराचा गाभारा देखील दगडी आहे. आतमध्ये निरव शांतता आणि कमालीचा गारवा आहे. पुणे महानगर पालिकेकडून सोमेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. यावेळी मंदिरामध्ये संगमरवरी काम करण्यात आले. त्यावर सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले आहे. गाभाऱ्यामध्ये स्वयंभू असे शिवलिंग आहे. शिवलिंगासमोर दगडी नंदी आहे. नंदीची झूल अतिशय कोरीव असून बारीक काम त्यावर दिसून येते. अनेक पुरातन मंदिरांपैकी एक असलेले हे पाषाणमधील सोमेश्वरवाडीचे सोमेश्वर मंदिर आपले वेगळेपण जपून आहे.

Web Title: Shravan special pashan swayambhu someshwar temple at pune where gold treasure found

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 03:55 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तरुण वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी घरीच तयार करा स्किन टाईटनिंग फेसमास्क, लूज त्वचा होईल घट्ट

तरुण वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी घरीच तयार करा स्किन टाईटनिंग फेसमास्क, लूज त्वचा होईल घट्ट

निवृत्तीच्या प्रश्नावर संतापला मोहम्मद शामी! म्हणाला- मी कोणाच्या आयुष्याचा दगड झालो आहे की…

निवृत्तीच्या प्रश्नावर संतापला मोहम्मद शामी! म्हणाला- मी कोणाच्या आयुष्याचा दगड झालो आहे की…

DPL 2025 : ‘ज्युनियर’ सेहवागने DPL 2025 मध्ये केले पदार्पण, आर्यवीर पहिल्या सामन्यात झाला फेल

DPL 2025 : ‘ज्युनियर’ सेहवागने DPL 2025 मध्ये केले पदार्पण, आर्यवीर पहिल्या सामन्यात झाला फेल

Top Marathi News Today Live : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

LIVE
Top Marathi News Today Live : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

Chattisgarh crime: जन्मदात्या आईचे कुऱ्हाडीने वार करत तुकडे- तुकडे केले, नंतर मृतदेहाच्या शेजारी बसून गाणे गेले, छत्तीसगड हादरलं!

Chattisgarh crime: जन्मदात्या आईचे कुऱ्हाडीने वार करत तुकडे- तुकडे केले, नंतर मृतदेहाच्या शेजारी बसून गाणे गेले, छत्तीसगड हादरलं!

मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही करू नका ‘या’ फळांचे सेवन, नैसर्गिक साखरेमुळे शरीराला पोहचेल हानी

मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही करू नका ‘या’ फळांचे सेवन, नैसर्गिक साखरेमुळे शरीराला पोहचेल हानी

Bigg Boss 19 : कोण होणार बिग बाॅस 19 चा पहिला कॅप्टन! झीशान कादरी नॉमिनेशनमध्ये आल्यावर डोकं चालेना

Bigg Boss 19 : कोण होणार बिग बाॅस 19 चा पहिला कॅप्टन! झीशान कादरी नॉमिनेशनमध्ये आल्यावर डोकं चालेना

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : नवसाला पावणारा असा गणपती; हेमाडपंथी शैलीतील प्राचीन गणेश मंदिर

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sambhajinagar : ठाकरे बंधूच्या एकत्रिकरणाचा महायुतीवर परिणाम होणार? काय म्हणाले भागवत कराड ?

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Sindhudurg : निलेश राणे आमदार व्हावेत, म्हणून कार्यकर्त्यांनी केला नवस

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Navi Mumbai : वाशीमध्ये नवसाला पावणाऱ्या महाराजाचे भव्य आगमन

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Pratap Sarnaik : ठाणेकरांना डिसेंबरपासून मेट्रोची भेट मिळण्याची शक्यता

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Eknath Shinde on Manoj Jarange : गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता, सगळी विघ्नं तोच दूर करेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.