Maharashtra Breaking News
28 Aug 2025 11:30 AM (IST)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अथर्वशीर्ष पठन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर दिसून आला. तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.
28 Aug 2025 11:20 AM (IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मनसे नेते राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्ताने भेट दिली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह बाप्पाचे दर्शन घेतले.
भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांनी राजसाहेबांच्या शिवतीर्थ या निवास्थानी येऊन सहपरिवार गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं...#गणेशोत्सव #MNSAdhikrut pic.twitter.com/jCCmcMPGYW
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 28, 2025
28 Aug 2025 11:09 AM (IST)
मराठी साहित्य विश्वामध्ये बहूमूल्य योगदान देणारे व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी अनेक कांदबरी आणि कथासंग्रहांचे लेखन केले आहे. विख्यात साहित्यिक ग. दि. माडगूळकर ह्यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू होते. त्यांनी अनेक कादंबरी, कथासंग्रह लिहिले. यातील एक लोकप्रिय कादंबरी म्हणजे बनगरवाडी आहे. याचबरोबर वावटळ, पुढचं पाऊल, करुणाष्टक आणि सत्तांतर अशा अनेक कादंबरी लिहिल्या आहेत. आजच्या दिवशी 2001 साली व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांची साहित्यकृती अजूनही त्यांचे अस्तित्व टिकवून आहे.
28 Aug 2025 10:55 AM (IST)
गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाने (Russia Ukraine War) संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. हे युद्ध दिवसेंदिवस घातल होत चालले आहे. रशियाने युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. नुकतेच रशियाने युक्रेनची राजधनी कीवर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. यामध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा वापर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
28 Aug 2025 10:50 AM (IST)
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांमधील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. पाकिस्तानने सोमवारी सकाळी अफगाणिस्तानातील खोस्त आणि नांगरहार प्रांतात मोठे हवाई हल्ले केले. पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या या कारवाईत मुलांसह किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. डुरंड रेषेजवळ झालेल्या या कारवाईमुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती अधिकच तीव्र झाली आहे.
28 Aug 2025 10:45 AM (IST)
आता या चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर आरसीबीच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी संदेश दिला यामध्ये नक्की त्यांनी काय म्हटले आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
View this post on Instagram
A post shared by Royal Challengers Bengaluru (@royalchallengers.bengaluru)
28 Aug 2025 10:30 AM (IST)
भारतामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे, घरोघरी गणरायाचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारताचे क्रिकेट खेळाडू सध्या विश्रांती करत आहेत त्याचबरोबर गणरायाचे स्वागत आणि सेवा करण्यात देखील व्यस्त आहेत. आता रोहित शर्मापासून ते जहीर खानपर्यत सर्वानीच सोशल मिडियावर त्याच्या गणरायाचे फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
28 Aug 2025 10:20 AM (IST)
मोठ्या स्पर्धा आणि मालिकांमध्ये सातत्याने दुर्लक्षित राहिल्यानंतर शमीच्या निवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोहम्मद शमीला हा प्रश्न विचारला असता, त्याने त्याच्या टीकाकारांची तोंडे बंद केली, “मला सांगा, मी कोणाचा जीवनरत्न बनलो आहे की तुम्ही मला निवृत्ती घ्यायची इच्छा बाळगता?” चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयात शमीने महत्त्वाची भूमिका बजावली, तो ९ विकेट्ससह स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
28 Aug 2025 10:10 AM (IST)
मुंबई म्हटले की गणेशोत्सवाची धामधूम आपोआप डोळ्यांसमोर उभी राहते. लालबागचा राजा, अंधेरीचा गणेश, गिरगावचा गणपती… असे कितीतरी मानाचे मंडळे आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक विशेष नाव घेतले जाते माटुंग्याच्या किंग्ज सर्कलमधील जीएसबी सेवा मंडळ. दरवर्षी इथे गणेशोत्सवाची भक्तीभाव आणि परंपरांची अद्भुत सांगड पाहायला मिळते. पण यंदा या मंडळाने केलेला विक्रम सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. 474.46 कोटी रुपयांचा विमा हा आकडा ऐकूनच आश्चर्य वाटते. भारतातील कोणत्याही गणेश मंडळाचा इतका मोठा विमा आतापर्यंत काढला गेला नव्हता. हा विक्रम आता जीएसबी सेवा मंडळाच्या नावावर जमा झाला आहे.
28 Aug 2025 09:45 AM (IST)
चालकाच्या चुकीमुळे अनेक अपघात होताना दिसत आहे. त्यात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी-मंगरुळ पांदण रस्त्यावर मंगळवारी (दि. २६) दुपारी सव्वा एकच्या सुमारास भीषण घटना घडली. टोलनाका वाचवण्यासाठी कंटेनर ट्रक पांदण रस्त्याने जात असताना 11 हजार व्होल्टच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने चालकाचा जागीच मृत्यू झाला.
28 Aug 2025 09:30 AM (IST)
जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी मुदतवाढ मिळूनही प्रमाणपत्र सादर न केलेल्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे.
28 Aug 2025 09:20 AM (IST)
दहशतवादी हल्ल्यावर मात करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कारंजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोलनाक्यावर रंगीत तालीम घेण्यात आली. ही तालीम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या उपस्थित घेण्यात आली.
Marathi Breaking News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस झाला. या झालेल्या विक्रमी पावसाने पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. श्री माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा बुधवारी 34 वर पोहोचला. या मुसळधार पावसाने गेल्या 115 वर्षांचा रेकॉर्डच मोडल्याचे दिसून येत आहे. याचा फटका तेथील नागरिकांना बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात आता जम्मूमध्ये नद्यांच्या लाटेमुळे अनेक प्रमुख पूल, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. सैन्यासह सर्व संस्था बचावकार्यात व्यस्त आहेत. आतापर्यंत 10000 हून अधिक लोकांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले आहे.