मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव आणि सतत जंक फूड आणि जीवनशैलीतील बदलांमुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर सुरुवातीला अतिशय सौम्य लक्षणे दिसून येतात, मात्र कालांतराने शरीरात अनेक बदल होऊ लागतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. आहारावर नियंत्रण न ठेवल्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढण्यास सुरुवात होते. मधुमेह वाढल्यानंतर शरीरातील इतर अवयवांनासुद्धा हानी पोहचते. त्यामुळे आहारात कमी साखरेचे आणि गोड पदार्थ खाऊ नये. मधुमेह झाल्यानंतर जीवनशैलीत बदल करून सतत गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोकं जड झाल्यासारखं वाटत? ‘हे’ उपाय करून मिळवा डोके दुखीपासून आराम
कायम निरोगी राहण्यासाठी आहारात फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण नैसर्गिक गोडवा असलेल्या फळांचे सेवन केल्यामुळे शरीरात अतिरिक्त साखर वाढू लागते. ज्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात कोणत्या फळांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढू लागेल. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही फळे विषा सामान ठरतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. आंब्यांमध्ये २५ ते ३० ग्रॅम कार्बोहायड्रेट आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. आंब्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स ५१ ते ६० इतके असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याचे सेवन करू नये. इतर गोड पदार्थांसोबत आंब्याचे अजिबात सेवन करू नये.
केळी खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात जास्त प्रमाणात केळी खाऊ नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची जास्त शक्यता असते. केळ्यांमध्ये २०–२५ ग्रॅम कार्बोहायड्रेट आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते. त्यामुळे आहारात नियमित केळी खाऊ नये.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं द्राक्ष खायला खूप जास्त आवडतात. नैसर्गिक गोडवा असलेल्या द्राक्षांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी द्राक्षांचे सेवन अजिबात करू नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्याला हानी पोहचते. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर ते नियंत्रणात ठेवणे अतिशय कठीण होऊन जाते.
मधुमेह म्हणजे काय?
तुमचे शरीर इन्सुलिन नावाचे संप्रेरक तयार करते, जे रक्तातील ग्लुकोज (साखर) शरीरातील पेशींमध्ये पोहोचवते. मधुमेहामध्ये, तुमचे शरीर एकतर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार केलेले इन्सुलिन योग्यरित्या वापरत नाही. यामुळे ग्लुकोज रक्तातच राहते आणि रक्तातील साखर वाढते.
मधुमेहाची लक्षणे?
खूप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, सतत थकवा जाणवणे, अस्पष्ट दिसणे, जखमा लवकर न भरणे आणि वजन कमी होणे ही काही इतर लक्षणे आहेत.