Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Theatre Day 2026 : रंगभूमी नसती तर कशी असती मानवी संस्कृती? जाणून घ्या ‘या’ प्राचीन कलेचा अद्भुत इतिहास

World Theatre Day: नाट्य ही एक प्राचीन कला आहे जी मानवी भावना, इतिहास आणि समाजाचे विविध पैलू रंगमंचावर जिवंत करते. नाटकांमध्ये सामाजिक समस्या, ऐतिहासिक घटना आणि मानवी संघर्ष चित्रित केले जातात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 27, 2026 | 10:50 AM
special feature world theatre day 27 march history significance marathi theatre 2026

special feature world theatre day 27 march history significance marathi theatre 2026

Follow Us
Follow Us:
  • जागतिक उत्सव
  • आरसा समाजाचा
  • जागतिक संदेश

World Theatre Day 2026 Theme : नाट्यगृह अंधारात बुडालेलं असतं, अचानक ‘तिसरी घंटा’ वाजते आणि पडदा सरकतो… त्या क्षणी समोर उभा असतो तो केवळ एक नट नसून, मानवी आयुष्यातील सुख-दु:खाचा एक जिवंत तुकडा असतो. आज २७ मार्च! जगभरातील रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस  ‘जागतिक रंगभूमी दिन’ (World Theatre Day). ही केवळ एक कला नाही, तर मानवी अस्तित्वाचा आरसा आहे.

रंगभूमी दिनाचा इतिहास आणि महत्त्व

१९६१ मध्ये ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट’ (ITI) ने या दिवसाची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून दरवर्षी २७ मार्च हा दिवस रंगभूमीची ताकद, तिची सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि समाजावरील प्रभावाला समर्पित केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे जगभरातील सरकारे, संस्था आणि जनतेला रंगभूमीचे महत्त्व पटवून देणे आणि या कलेला राजाश्रय मिळवून देणे हा आहे. दरवर्षी एका दिग्गज नाट्य कलाकाराची निवड केली जाते, जो जगाला रंगभूमीच्या भविष्याबद्दल आणि शांततेबद्दल संदेश देतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3 : युद्धविराम म्हणजे आत्महत्या! Saudi Arabia आणि UAE आता थेट मैदानात; अमेरिकेला दिलं विनाशाचं निमंत्रण

रंगभूमी: मानवी भावनांचे जिवंत विद्यापीठ

नाट्य ही जगातील सर्वात प्राचीन कलांपैकी एक आहे. जेव्हा टीव्ही, इंटरनेट किंवा चित्रपट नव्हते, तेव्हा नाटकच मानवी समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करत होते. ऐतिहासिक काळ असो वा आधुनिक काळ, नाटकाने नेहमीच समाजातील ज्वलंत समस्यांना वाचा फोडली आहे. मग ते मानवी मनातील अंतर्गत संघर्ष असोत, सामाजिक अन्यायाविरुद्धचा लढा असो किंवा प्रेम आणि विरहाची गोष्ट असो; रंगमंचावर जिवंत होणाऱ्या पात्रांमध्ये प्रेक्षक स्वतःला शोधत असतात.

Theatre is more than performance, it is emotion in its purest form. From whispered dialogues to powerful monologues, it reflects the realities we live and the dreams we chase. This World Theatre Day, we honor the artists who turn stories into experiences and stages into worlds of… pic.twitter.com/g9tpemv28W — DD News (@DDNewslive) March 27, 2026

credit – social media and Twitter

मराठी रंगभूमी आणि जागतिक वारसा

आपल्या मराठी मातीचा विचार केला तर, विष्णुदास भावे यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आजही अत्यंत दिमाखात सुरू आहे. संगीत नाटके असोत किंवा प्रायोगिक नाटके, मराठी रंगभूमीने नेहमीच जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. आजही ‘नटसम्राट’ सारखी नाटके पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी येते, हेच रंगभूमीच्या ताकदीचे जिवंत उदाहरण आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अनेक नाट्यगृहांमध्ये विशेष प्रयोग, चर्चासत्रे आणि कार्यशाळांचे आयोजन करून नव्या पिढीला या कलेकडे आकर्षित केले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Slavery Reparations : ‘आम्ही पैसे देणार नाही!’ ब्रिटनचा आरडाओरडा; पण भारताच्या एका मताने ‘असं’ बदललं जगाचं चित्र

आव्हाने आणि भविष्याची वाटचाल

आजच्या डिजिटल युगात ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाशी रंगभूमीला मोठी स्पर्धा करावी लागत आहे. मात्र, प्रत्यक्ष रंगमंचावर कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात जो जिवंत संवाद घडतो, तो अनुभव कोणताही पडदा देऊ शकत नाही. रंगभूमीला टिकवून ठेवण्यासाठी तरुण कलाकारांनी नवीन तंत्रज्ञान आणि विषयांची जोड देणे आवश्यक आहे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसादच या कलेचा खरा श्वास आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक रंगभूमी दिन कधी आणि का साजरा केला जातो?

    Ans: दरवर्षी २७ मार्च रोजी रंगभूमीच्या कलेचा प्रचार करण्यासाठी आणि कलाकारांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • Que: या दिवसाची स्थापना कोणी केली?

    Ans: १९६१ मध्ये युनेस्कोशी संबंधित असलेल्या 'इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट' (ITI) ने या दिवसाची स्थापना केली.

  • Que: 'जागतिक रंगभूमी दिन संदेश' म्हणजे काय?

    Ans: दरवर्षी आयटीआय एका प्रसिद्ध नाट्य तज्ज्ञाला आमंत्रित करते, जो रंगभूमीच्या वर्तमान आणि भविष्यातील भूमिकेवर जगाला उद्देशून एक संदेश लिहितो.

Web Title: Special feature world theatre day 27 march history significance marathi theatre 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला
1

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला

World Rainforest Day 2026: दर मिनिटाला नष्ट होत आहेत 40 फुटबॉल मैदानाएवढी जंगले; ‘पृथ्वीची फुफ्फुसे’ वाचवण्यासाठी आजच व्हा सतर्क
2

World Rainforest Day 2026: दर मिनिटाला नष्ट होत आहेत 40 फुटबॉल मैदानाएवढी जंगले; ‘पृथ्वीची फुफ्फुसे’ वाचवण्यासाठी आजच व्हा सतर्क

World Giraffe Day : वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि जगातील सर्वात उंच प्राणी; जाणून घ्या ‘जागतिक जिराफ दिन’ का आहे खास
3

World Giraffe Day : वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि जगातील सर्वात उंच प्राणी; जाणून घ्या ‘जागतिक जिराफ दिन’ का आहे खास

International Yoga Day: PM मोदींच्या ‘त्या’ एका प्रस्तावाने इतिहास रचला! पाहा 177 देशांच्या पाठिंब्याने योग कसा बनला जागतिक उत्सव?
4

International Yoga Day: PM मोदींच्या ‘त्या’ एका प्रस्तावाने इतिहास रचला! पाहा 177 देशांच्या पाठिंब्याने योग कसा बनला जागतिक उत्सव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.