Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट…

साधेपणातले सौंदर्य जपत पूर्वीच्या काळात रांगोळी ही घरातील महिलांच्या दैनंदिन पारंपारिकचा भाग होती. अंगण झाडून, धुवून, स्वच्छ केले की त्या जमिनीवर तांदळाचे पीठ, हळद-कुंकू, गेरू अशा नैसर्गिक पदार्थांनी रांगोळी काढली जायची.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2025 | 09:49 PM
Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट...

Diwali 2025: काळानुसार बदलले रांगोळीचे स्वरूप; पारंपरिकतेपासून थेट...

Follow Us
Follow Us:

रांगोळी काढण्याची प्रथा ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग
रांगोळी शुभ सौंदर्याचे आणि स्वागताचे प्रतीक
काळानुसार बदलत गेले रांगोळीचे स्वरूप

सुनयना सोनवणे/पुणे: दिवाळीच्या सणात रांगोळी काढण्याची प्रथा ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.भारतीय संस्कृतीत रांगोळी ही केवळ सजावट नसून ते शुभ सौंदर्याचे आणि स्वागताचे प्रतीक आहे. असे मानले जाते की रांगोळीने घरात लक्ष्मीचे आगमन होते. सकारात्मक ऊर्जा वातावरणात दरवळते. काळानुसार रांगोळीचे स्वरूप आणि प्रकार बदलले असले तरी तिचा उद्देश तोच आहे.

पारंपरिक रांगोळीचे प्रकार
साधेपणातले सौंदर्य जपत पूर्वीच्या काळात रांगोळी ही घरातील महिलांच्या दैनंदिन पारंपारिकचा भाग होती. अंगण झाडून, धुवून, स्वच्छ केले की त्या जमिनीवर तांदळाचे पीठ, हळद-कुंकू, गेरू अशा नैसर्गिक पदार्थांनी रांगोळी काढली जायची. या नैसर्गिक रंगांमुळे रांगोळीला शुद्धता आणि पारंपरिक सौंदर्य लाभते. पूर्वीच्या काळात रांगोळ्या अत्यंत साध्या, पण कलात्मक आणि प्रतीकात्मक असत.

पारंपरिक रांगोळीचे काही प्रमुख प्रकार
१. बिंदू रांगोळी – बिंदू जोडून तयार होणारी गणिती अचूक रचना.
२. पद्म रांगोळी – कमळाच्या आकारावर आधारित, लक्ष्मीपूजनासाठी लोकप्रिय.
३. शुभ-लाभ रांगोळी – स्वस्तिक, ओम, दीप, शुभ-लाभ अशी शुभ चिन्हे असलेली रांगोळी.
४. भूगोलावर आधारित रांगोळी – सममिती, आकृत्या आणि कोन वाप

Diwali 2025: दिवाळी सण माणसांसाठी आनंदाचा मात्र पक्ष्यांसाठी ठरतोय ‘कर्दनकाळ’; नेमके कारण काय?

आधुनिक काळातील रांगोळींचे वैविध्य 
आजच्या काळात रांगोळी कलेने आधुनिकतेचा स्वीकार केला आहे. आता पारंपरिकतेसोबत नवीन प्रयोग दिसतात.
१. थीम आधारित रांगोळी – एखाद्या विषयावर, सामाजिक संदेशावर किंवा सणाच्या थीमवर आधारित रांगोळी.
२. थ्री डी रांगोळी – दृष्टीभ्रम निर्माण करणारी, त्रिमितीय परिणाम देणारी रांगोळी.
३. फुलांची रांगोळी – झेंडू, गुलाब, शेवंती यांच्या पाकळ्यांनी सजवलेली आकर्षक रचना.
४. कृत्रिम पावडर रंगांची रांगोळी – तयार केलेल्या रंगीत पावडरने काढलेली रांगोळी, जी अधिक चमकदार व टिकाऊ असते.
५. एलईडी, आरसे आणि ग्लिटर वापरून केलेली रांगोळी – आधुनिक सजावटीचे घटक वापरून तयार केलेली रांगोळी, जी रात्रीच्या उजेडात अधिक आकर्षक दिसते.
६. रेडीमेड रांगोळी – आजकाल रेडीमेड रांगोळी (पूर्वतयार डिझाइन्स, स्टेन्सिल किंवा स्टिकर स्वरूपात) देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. ती वापरण्यास सोपी, स्वच्छ आणि वेळ वाचवणारी असल्यामुळे गृहिणी व कामकाजात गुंतलेल्या लोकांमध्ये तिची मोठी मागणी आहे.

दिवाळीच्या आठवडाभर आधीच आमच्या दुकानात रंगांचा मेळा भरतो. निऑन, मेटॅलिक, सिल्वर, गोल्डश रंगांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. तसेच आता लोक डी.आय.वाय. रांगोळी किट्सही घेऊन जातात.
-संतोष पवार, रांगोळी विक्रेते

फुलांच्या रांगोळ्यांसाठी झेंडू, गुलाब, शेवंती या फुलांची मागणी प्रचंड वाढली आहे. आता लोक रांगोळीला फुलांचा सुगंध आणि आधुनिक सजावटीच्या रूपात रंगवतात.
– फुलविक्रेते, मंडई

दिवाळी पहाट सारख्या मोठ्या कार्यक्रमांना रांगोळी काढण्यासाठी जास्त मागणी वाढते. पारंपारिक कथेसोबतच नाविन्य असलेल्या रांगोळ्यां लोकांना जास्त आवडतात. सोशल मीडियामुळे रांगोळी अधिक लोकप्रिय होते. आधुनिक रंग, थ्रीडी, एम्बॉस अशा रांगोळ्यांची मागणी जास्त आहे.
-वर्षा भराटे, रांगोळी प्रशिक्षक आणि कलाकार

Web Title: The form of rangoli during diwali has changed from traditional to modern navarashtra special story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • navarashtra special

संबंधित बातम्या

National Read A Book Day: स्क्रीनपासून दूर, पुस्तकांच्या जगात; जाणून घ्या मानसिक ताण कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग
1

National Read A Book Day: स्क्रीनपासून दूर, पुस्तकांच्या जगात; जाणून घ्या मानसिक ताण कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग

Coffee Ice-Cream Day: कॉफीची गडद चव आणि आईस्क्रीमचा थंडगार स्पर्श; एकत्र येऊन बनणाऱ्या ‘कॉफी आईस्क्रीम’चा हा जागतिक गौरव
2

Coffee Ice-Cream Day: कॉफीची गडद चव आणि आईस्क्रीमचा थंडगार स्पर्श; एकत्र येऊन बनणाऱ्या ‘कॉफी आईस्क्रीम’चा हा जागतिक गौरव

Teacher’s Day 2026 : आज आहे गुरू-शिष्य परंपरेचा महान उत्सव; जाणून घ्या शिक्षक दिनाचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व
3

Teacher’s Day 2026 : आज आहे गुरू-शिष्य परंपरेचा महान उत्सव; जाणून घ्या शिक्षक दिनाचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व

World Samosa Day : इराणचा ‘संबोसा’ कसा बनला भारताचा ‘समोसा’? जागतिक समोसा दिनानिमित्त जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास
4

World Samosa Day : इराणचा ‘संबोसा’ कसा बनला भारताचा ‘समोसा’? जागतिक समोसा दिनानिमित्त जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.