
today in history 15 january wikipedia birthday indian army day bihar earthquake facts
Wikipedia Foundation Day facts : आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल, तर आपण सर्वात आधी गुगलवर जातो आणि तिथे बहुतांश वेळा जे पहिले पान दिसते, ते असते ‘विकिपीडिया’चे (Wikipedia). माहितीचे हे अथांग विश्व आज आपला २५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. १५ जानेवारी २००१ रोजी जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर यांनी एका छोट्या कल्पनेतून सुरू केलेले हे व्यासपीठ आज जगातील सर्वात मोठे ‘मल्टीलिंग्वल फ्री एनसायक्लोपीडिया’ बनले आहे.
विकिपीडिया सुरू होण्यापूर्वी जिमी वेल्स यांनी ‘नुपीडिया’ (Nupedia) नावाचा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, तिथे फक्त तज्ज्ञच लिहू शकत होते. ही प्रक्रिया संथ असल्याने त्यांनी ‘विकिपीडिया’ची संकल्पना मांडली, जिथे सामान्य माणूसही माहिती संपादित (Edit) करू शकतो. यालाच तांत्रिक भाषेत ‘क्राउडसोर्सिंग’ म्हणतात. सुरुवातीला केवळ इंग्रजीत असलेल्या या पोर्टलवर आज ३०० पेक्षा जास्त भाषांमध्ये माहिती उपलब्ध आहे. २००३ मध्ये हिंदी तर त्यानंतर मराठी भाषेतही विकिपीडिया सुरू झाला. दरमहा २ अब्जाहून अधिक लोक या साइटला भेट देतात, यावरूनच याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL VIDEO: ‘हिंदूंची गळे कापूनच काश्मीर मिळेल…’ लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा भारताविरुद्ध कट्टरतावादी विषारी प्रचार
आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल के.एम. करिअप्पा यांनी ब्रिटीश जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराची सूत्रे हाती घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर-इन-चीफ बनले. त्यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ जानेवारी हा दिवस ‘भारतीय लष्कर दिन’ म्हणून साजरा केला जातो. सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या आपल्या वीर जवानांना मानवंदना देण्याचा हा दिवस आहे.
Today is Wikipedia’s birthday 🎂#WikipediaDay 🧵⬇️ (1/4) pic.twitter.com/kAdXVMHTyP — Wikipedia (@Wikipedia) January 15, 2024
credit – social media and Twitter
इतिहासाच्या पानांवर आजची तारीख एका दुःखद घटनेनेही नोंदवलेली आहे. १९३४ मध्ये आजच्याच दिवशी भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात ८.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला होता. या नैसर्गिक आपत्तीत बिहारमधील मुंगेर आणि मुझफ्फरपूर सारखी शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. सुमारे ११,००० लोकांचा मृत्यू झाला होता. या भूकंवाचे धक्के इतके तीव्र होते की ते मुंबईपर्यंत जाणवले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamic NATO: आशियात नव्या लष्करी युतीचा थरार! भारतासाठी ठरणार ‘लार्जर थ्रेट’; अण्वस्त्रे आणि आधुनिक शस्त्रांचा नवा गेमप्लॅन
Ans: विकिपीडियाची स्थापना १५ जानेवारी २००१ रोजी जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर यांनी केली होती.
Ans: १५ जानेवारी १९४९ रोजी के.एम. करिअप्पा यांनी भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता, म्हणून हा दिवस लष्कर दिन म्हणून साजरा होतो.
Ans: १५ जानेवारी १९३४ रोजी भारत आणि नेपाळमध्ये झालेल्या ८.३ रिश्टर स्केलच्या भूकंपात ११,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.