विकिपीडियाला भारत सोडावा लागू शकतो. सध्या याची सर्वत्र फार चर्चा आहे. या प्रकरणी न्यायालयाने धारदार विधान केले आहे. तुम्हाला भारत आवडत नसेल तर कृपया भारतात काम करू नका, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतात विकिपीडिया ब्लॉक करण्याबाबत सरकारशी बोलणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, प्रश्न असा पडतो की विकिपीडिया नक्की काय काय आणि त्याच्या बंदचा भारतावर काय परिणाम होईल? चला तर आज याविषयीच काही बाबी जाणून घेऊयात.
विकिपीडिया ही एक ओपन वेबसाइट आहे. देश आणि जगातील प्रत्येक गोष्टीची माहिती येथे उपलब्ध आहे. तुम्हाला ऑनलाइन काहीही शोधायचे असेल तर तुम्ही विकिपीडियाची मदत घेऊ शकता. मुळातच विकिपीडिया हा शब्द, विकी आणि एनसायक्लोपीडिया या दोन शब्दांपासून बनवला गेला आहे. हे एक ओपन व्यासपीठ आहे ज्यावर जगभरातील कोणीही एडिट करून माहिती प्रदान करू शकतो.
हेदेखील वाचा – Jio 8th anniversary Offer: मुकेश अंबानी देत आहेत Free Data आणि OTT, आता वर्षभर दाबून वापरता येईल इंटरनेट
वास्तविक, ANI या वृत्तसंस्थेचे विकिपीडिया पेज कोणीतरी एडिट केले आणि त्याला वर्तमान सरकारचे “प्रपोगांडा टूल” असे म्हटले, ज्यासाठी ANI’ने दिल्ली उच्च न्यायालयात अवमानाचा खटला दाखल केला होता. अशा स्थितीत दिल्ली हायकोर्टाने विकिपीडियाला त्या तीन लोकांची नावे उघड करण्यास सांगितले आहे ज्यांनी पेज एडिट केले आहे. या प्रकरणी विकिपीडियाने म्हटले आहे की, कारण विकिपीडिया भारतात स्थित नाही. अशा परिस्थितीत त्यांना या खटल्यात जबाब नोंदवण्यासाठी वेळ हवा आहे.
विकिपीडिया ही भारतातील बहुतांश भाषांमध्ये उपलब्ध असलेली ऑनलाइन वेबसाइट आहे. त्याचे सर्वात लोकप्रिय व्हर्जन हिंदी आणि इंग्रजी आहेत. विकिपीडियावर भारतात बंदी घातली तर ते सर्चिंगच्या प्राथमिक स्त्रोतला बंद केल्यासारखे होईल. विकिपीडियाबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅटफॉर्मवर प्रत्येक सर्चची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. जेव्हा तुम्ही गुगलवर काहीही शोधता तेव्हा तुम्हाला अनेक वेबसाइट्सला भेट द्यावी लागते आणि माहिती गोळा करावी लागते, तर विकिपीडिया तुम्हाला एकाच ठिकाणी तपशीलवार माहिती पुरवते.
हेदेखील वाचा – आता विना इंटरनेट करता येईल UPI पेमेंट, फक्त हा सिक्रेट कोड लक्षात ठेवा
सध्या चॅटजीटीपी, गुगल जेमिनी या एआय टूल्सच्या मदतीने कोणत्याही सर्चशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळवता येते. AI टूल्सच्या विश्वासार्हतेबद्दल संभ्रम असला तरी, विकिपीडिया हे मोठ्या प्रमाणावर विश्वासार्ह ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे.