very peaceful and free from communal riots state of India Sikkim nature travel
भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात अनेक प्रांत आणि राज्य आहेत. जशी आपल्याकडे विविधतेची परंपरा आहे त्याला, जातीय बंधनांचा विळखा आहे हेही तितकेच खरे. जातीय मतभेदांमुळे किंवा भावना दुखावल्यामुळे अनेकदा सामाजिक तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर, देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या आणि लहान दंगली घडल्या आहेत, ज्यांचा समाज आणि राजकारणावर परिणाम झाला आहे. मात्र संपूर्ण देशामध्ये असा एक प्रदेश आहे जिथे आजपर्यंत दंगलीचा प्रकार घडलेला नाही.
भारतामध्ये असे अनेक राज्य आहेत जिथे राजकीय आणि जातीय वाद निर्माण झाले आहे. निवडणूका जवळ आल्या की अनेकदा याचा गैरफायदा घेतला जातो. मात्र देशामध्ये काही प्रदेश असे आहेत जिथे कधीही मोठे जातीय दंगली झाल्या नाहीत. या भागांना शांतता आणि परस्पर बंधुत्वाचे प्रतीक मानले जाते. अरबी समुद्रात वसलेले लक्षद्वीप हे भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. सुमारे ७०,००० लोकसंख्या असलेले हे राज्य बहुसंख्य मुस्लिम आहे. भारताच्या या प्रदेशामध्ये दंगल, सामाजिक वादाची कोणतीही ठिणगी अद्याप पडलेली नाही. यामुळे सर्वात शांत म्हणून भारताचा हा प्रदेश ओळखला जातो.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ईशान्य भारतात असलेले सिक्कीम १९७५ मध्ये भारतात सामील झाला. तेव्हापासून, हे राज्य त्याच्या सतत शांततापूर्ण वातावरणासाठी ओळखले जाते. या छोट्या बेटांवर राहणारे लोक मासेमारी, नारळ उत्पादन आणि पर्यटन यातून आपला उदरनिर्वाह करतात. मर्यादित लोकसंख्या, मजबूत स्थानिक प्रशासन आणि सामुदायिक एकता येथील शांतता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पर्यटकांचा मोठा ओढा देखील याठिकाणी दिसून येते. रोजच्या गर्दीच्या आणि आवाज, भांडणामधून बाहेर पडून शांतता मिळवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथे जातात.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सिक्कीम हे सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे, जिथे नेपाळी, लेप्चा आणि भुतिया समुदाय आहेत. परंतु असे असूनही, त्यांच्यामध्ये बंधुभाव आणि सहअस्तित्वाची खोल परंपरा आहे. धार्मिक किंवा सांप्रदायिक दंगलींच्या कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत. सिक्कीमची पर्यटन-आधारित आर्थिक रचना आणि शिक्षणावर भर देणारी धोरणे देखील सामाजिक स्थिरता राखण्यास मदत करतात. सिक्किममधील कमी लोकसंख्या, सांप्रदायिक सौहार्द आणि राजकीय स्थिरता हे या प्रदेशांना दंगलमुक्त ठेवण्याचे प्रमुख घटक आहेत. शिवाय, लक्षद्वीपच्या बेटाचे स्वरूप आणि सिक्कीमचा डोंगराळ प्रदेश यासारख्या भौगोलिक परिस्थिती देखील बाह्य हस्तक्षेपाला देखील रोखून ठेवतात त्यामुळे शांतता कायम राहिली आहे.