Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशामध्ये धवल क्रांती करणारे व्हर्गिस कुरियन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 09 सप्टेंबरचा इतिहास

दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 09, 2025 | 10:52 AM
White Revolution in india Verghese Kurien Death anniversary, 09 September History Marathi dinvishesh

White Revolution in india Verghese Kurien Death anniversary, 09 September History Marathi dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे व्हर्गिस कुरियन यांनी अमूल कंपनीची स्थापना केली. देशातील घराघरात आजही याच कंपनीची आईस्क्रीम आणि इतर उत्पादन मोठ्या विश्वासाने खरेदी केले जातात. दुग्ध उत्पादनात भारताला अग्रेसर बनवण्यात कुरियन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आजच्या दिवशी त्यांचे 2012 साली निधन झाले. त्यांनी देशामध्ये दुग्धाची क्रांती केली.

09 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1543 : नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.
  • 1791 : वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.
  • 1839 : जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.
  • 1850 : कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे 31वे राज्य बनले.
  • 1939 : प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.
  • 1945 : दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.
  • 1985 : मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
  • 1990 : श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे 184 तामिळींची हत्या केली.
  • 1991 : ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
  • 1994 : स्पेस शटल प्रोग्राम : STS-64 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली.
  • 1997 : 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.
  • 2001 : व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
  • 2006 : स्पेस शटल प्रोग्राम : स्पेस शटल अटलांटिस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे एकत्रीकरण पुन्हा सुरू करण्यासाठी STS-115 वर प्रक्षेपित करण्यात आले. 2003 मध्ये कोलंबिया आपत्तीनंतरची ही पहिली ISS असेंब्ली मिशन आहे
  • 2009 : दुबई मेट्रो, अरबी द्वीपकल्पातील पहिले शहरी रेल्वे नेटवर्क, समारंभपूर्वक उद्घाटन झाले.
  • 2012 : सलग 21 यशस्वी PSLV प्रक्षेपणांच्या मालिकेत भारतीय अंतराळ संस्थेने आतापर्यंतचा सर्वात वजनदार परदेशी उपग्रह प्रक्षेपण केले.
  • 2015 : एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.
  • 2016 : उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

09 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1828 : ‘लिओ टॉलस्टॉय’ – रशियन लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 20 नोव्हेंबर 1910)
  • 1850 : ‘भारतेंदू हरिश्चंद्र’ – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 6 जानेवारी 1885)
  • 1890 : ‘कर्नल सँडर्स’ – केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 डिसेंबर 1980)
  • 1910 : ‘नवलमल फिरोदिया’ – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1997)
  • 1904 : ‘फिनोझ खान’ – भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू यांचा जन्म. (मृत्यू : 21 एप्रिल 2005)
  • 1905 : ‘ब्रह्मारीश हुसैन शा’ – भारतीय तत्त्वज्ञानी आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 24 सप्टेंबर 1981)
  • 1909 : ‘लीला चिटणीस’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 14 जुलै 2003)
  • 1941 : ‘अबीद अली’ – अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1941 : ‘डेनिस रिची’ – सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 12 ऑक्टोबर 2011)
  • 1950 : ‘श्रीधर फडके’ – संगीतकार यांचा जन्म.
  • 1967 : ‘अक्षयकुमार’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1974 : ‘कॅप्टन विक्रम बात्रा’ – कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीरचक्र प्राप्त यांचा जन्म.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

09 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1438 : ‘एडवर्ड’ – पोर्तुगालचा राजा यांचे निधन. (जन्म : 31 ऑक्टोबर 1391)
  • 1942 : ‘शिरीष कुमार’ – स्वातंत्र्यसैनिक यांचा गोळी लागून मृत्यू. (जन्म : 28 डिसेंबर 1926)
  • 1960 : ‘जिगर मोरादाबादी’ – उर्दू कवी व शायर यांचे निधन. (जन्म : 6 एप्रिल 1890)
  • 1976 : ‘माओ त्से तुंग’ – आधुनिक चीनचे शिल्पकार यांचे निधन. (जन्म : 26 डिसेंबर 1893)
  • 1978 : ‘जॅक एल. वॉर्नर’ – वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक यांचे निधन. (जन्म : 2 ऑगस्ट 1892)
  • 1994 : ‘सत्यभामाबाई पंढरपूरकर’ – लावणी सम्राज्ञी यांचे निधन.
  • 1997 : ‘आर. एस. भट’ – युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन.
  • 1999 : ‘पुरुषोत्तम दारव्हेकर’ – नाटककार व लेखक यांचे निधन.
  • 2001 : ‘अहमदशाह मसूद’ – अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री यांची हत्या. (जन्म : 2 सप्टेंबर 1953)
  • 2010 : ‘वसंत नीलकंठ गुप्ते’ – समाजवादी कामगारनेते, लेखक यांचे निधन. (जन्म : 9 मे 1928)
  • 2012 : ‘व्हर्गिस कुरियन’ – भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक यांचे निधन.

Web Title: White revolution in india verghese kurien death anniversary 09 september history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्ती व्ही. शांताराम यांची आज जयंती; जाणून घ्या 18 नोव्हेंबरचा इतिहास
1

चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्ती व्ही. शांताराम यांची आज जयंती; जाणून घ्या 18 नोव्हेंबरचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास
2

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास
3

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास
4

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.