Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

World Mosquito Day 2025:डासांना जगातील सर्वात धोकादायक कीटकांपैकी एक मानले जाते. हे लहान दिसणारे कीटक दरवर्षी लाखो लोकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि झिका सारख्या आजारांनी आजारी पाडतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 20, 2025 | 10:31 AM
Why Mosquito Risk is Rising in 2025 and How to Prevent

Why Mosquito Risk is Rising in 2025 and How to Prevent

Follow Us
Follow Us:

World Mosquito Day 2025 : दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन (World Mosquito Day) साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला ब्रिटिश शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांच्या महान शोधाची आठवण करून देतो. १८९७ साली त्यांनी डास आणि मलेरिया यांचा थेट संबंध उघडकीस आणला आणि तेव्हापासून मानवजातीला डासांविरुद्ध लढण्यासाठी दिशा मिळाली.

२०२५ मध्ये या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे, कारण डास आजही जगातील सर्वात धोकादायक कीटक मानले जातात. आकाराने लहान असले तरी डास दरवर्षी लाखो लोकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झिका, जपानी एन्सेफलायटीस आणि पिवळा ताप यांसारख्या आजारांनी त्रस्त करतात. या आजारांपैकी काही जीवघेणे ठरू शकतात. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध यांना त्यांचा जास्त धोका असतो.

 २०२५ ची थीम काय आहे?

या वर्षीच्या जागतिक डास दिनाची थीम आहे  “अधिक समतापूर्ण जगासाठी मलेरियाविरुद्धच्या लढाईला गती देणे”. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरात अब्जावधी लोक दरवर्षी या आजारांच्या विळख्यात सापडतात. त्यामुळे डास नियंत्रण आणि प्रतिबंध हीच खरी सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.

हे देखील वाचा : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

 डासांमुळे होणारे प्रमुख आजार

  • मलेरिया – अ‍ॅनोफिलिस डासामुळे पसरतो. ताप, थंडी, अशक्तपणा ही प्रमुख लक्षणे.
  • डेंग्यू – एडिस इजिप्ती डास पसरवतो. उंच ताप, लाल पुरळ, तीव्र अंगदुखी, सांधेदुखी होते.
  • चिकनगुनिया – दीर्घकाळ टिकणारी सांधेदुखी आणि उंच ताप.
  • झिका विषाणू – गर्भवती महिलांसाठी धोकादायक; मुलांमध्ये जन्मजात दोष उद्भवू शकतो.
  • जपानी एन्सेफलायटीस व पिवळा ताप – मेंदू आणि यकृतावर परिणाम करणारे आजार.

डास टाळण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची

डास नेहमी साचलेल्या पाण्यात आणि अस्वच्छतेत वाढतात. जर आपण आपल्या परिसरात स्वच्छता राखली, तर डासांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करता येते.

  • घरातील भांडी, कूलर, ट्रे यामधील पाणी नियमित बदला.
  • पाण्याच्या टाक्या व बादल्या नेहमी झाकून ठेवा.
  • घराभोवती नाले, खड्डे यामध्ये पाणी साचू देऊ नका.
  • कचरा साचू देऊ नका, वेळेवर टाकून द्या.

डेंग्यू-मलेरिया टाळण्यासाठी घरगुती उपाय

भारतीय पारंपरिक उपाय आजही प्रभावी ठरतात:

  • कडुलिंबाचे तेल व कापूर – पाण्यात मिसळून फवारणी करा किंवा कापूर जाळून खोलीत ठेवा.
  • तुळशीचे रोप – घरात लावल्याने डास दूर राहतात.
  • लसूण व पुदिन्याचे तेल – दोन्हींचा वास डासांना सहन होत नाही.
  • मोहरी व नारळाचे तेल – मिश्रण शरीरावर लावल्यास डास चावत नाहीत.
  • लिंबू-लवंगा उपाय – लिंबाच्या तुकड्यांत लवंगा खोवून खोलीत ठेवा.

हे देखील वाचा : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?

 काही खास खबरदारी

  • विशेषतः मुलांसाठी मच्छरदाणी वापरा.
  • बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
  • घरातील खिडक्या-दारे जाळीदार ठेवा.
  • स्वच्छता मोहीमेत सहभाग घ्या आणि इतरांनाही जागरूक करा.

Web Title: Why mosquito risk is rising in 2025 and how to prevent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • Health News
  • navarashtra special story
  • special story
  • World Mosquito Day

संबंधित बातम्या

Surveillance Day 2026: दरवर्षी 16 ऑगस्टलाच का साजरा होतो ‘निगराणी दिन’? जाणून घ्या यामागचे खास आणि रंजक कारण
1

Surveillance Day 2026: दरवर्षी 16 ऑगस्टलाच का साजरा होतो ‘निगराणी दिन’? जाणून घ्या यामागचे खास आणि रंजक कारण

National Roller Coaster Day :रोलर कोस्टर राईडचा थरार आणि इतिहास! जाणून घ्या ‘राष्ट्रीय रोलर कोस्टर दिन’ का साजरा केला जातो?
2

National Roller Coaster Day :रोलर कोस्टर राईडचा थरार आणि इतिहास! जाणून घ्या ‘राष्ट्रीय रोलर कोस्टर दिन’ का साजरा केला जातो?

Makkah Agreement: पुढील भारत-पाक युद्ध सौदी अरेबियामार्फत; IMEC ठरेल ओझे; इस्रायली तज्ज्ञ शाय गाल यांचा खळबळजनक दावा
3

Makkah Agreement: पुढील भारत-पाक युद्ध सौदी अरेबियामार्फत; IMEC ठरेल ओझे; इस्रायली तज्ज्ञ शाय गाल यांचा खळबळजनक दावा

Independence Day 2026: भारतीय स्वातंत्र्य दिन; 15 ऑगस्टचा सुवर्ण इतिहास, लाल किल्ल्यावरील सोहळा अन् ‘युवा शक्ती’चा हुंकार
4

Independence Day 2026: भारतीय स्वातंत्र्य दिन; 15 ऑगस्टचा सुवर्ण इतिहास, लाल किल्ल्यावरील सोहळा अन् ‘युवा शक्ती’चा हुंकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.