National Black Cat Appreciation Day : इजिप्तपासून भारतापर्यंत... काय आहे 'Black Cat's' चा गूढ इतिहास? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
National Black Cat Appreciation Day 2025 : कधी एखादी काळी मांजर रस्त्यातून जाताना तुमच्या मनात भीती किंवा शंका निर्माण झाली आहे का? शतकानुशतकं चालत आलेल्या अंधश्रद्धांमुळे आजही काळ्या मांजरींना दुर्दैवाचं प्रतीक मानलं जातं. पण खरं तर हा सुंदर जीव आपल्या आयुष्यात नशीब, आनंद आणि स्नेह घेऊन येऊ शकतो. त्यासाठीच दरवर्षी १७ ऑगस्ट रोजी ‘नॅशनल ब्लॅक कॅट अॅप्रिसिएशन डे’ साजरा केला जातो.
प्राचीन काळी मांजरींना देवतांप्रमाणे मान मिळायचा. इजिप्तमध्ये तर बास्टेट ही युद्धदेवी मांजरीच्या चेहऱ्याची मानली जायची. राजघराण्यातील मांजरींना सोन्याचे दागिने घातले जायचे आणि मालकाच्या ताटातला अन्नाचा पहिला घासही त्यांनाच दिला जायचा. मात्र युरोपातील सेल्टिक कथांमध्ये मांजरी परींच्या रूपात दिसू शकतात असा समज होता. पुढे यात्रेकरूंनी या श्रद्धांना मूर्तिपूजा मानून काळ्या मांजरींना राक्षस व चेटकिणींचं प्रतीक ठरवलं. यामुळे काळ्या मांजरी पाळणाऱ्यांवर शिक्षा व्हायची, अगदी प्राण्यांची कत्तलही केली जायची. या भीषण इतिहासामुळे आजही पाश्चिमात्य देशांत काळ्या मांजरींच्या वाट्याला संशय व दुर्लक्ष येतं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाचे ढग गडद! अमेरिका-ब्रिटनमध्ये तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? 25 वर्ष टिकणारा अन्नसाठा, भूमिगत बंकरची तयारी
आजच्या काळातसुद्धा प्राण्यांच्या आश्रयस्थानांत काळ्या मांजरी आणि त्यांची पिल्लं अनेकदा जास्त दिवस अडकून राहतात. लोक त्यांना दत्तक घेण्याऐवजी रंगीत मांजरींना पसंती देतात. प्रत्यक्षात काळ्या मांजरी इतर कोणत्याही जातीइतक्याच खेळकर, बुद्धिमान आणि प्रेमळ असतात. विशेष म्हणजे बॉम्बे जातीच्या काळ्या मांजरी त्यांच्या खेळकर स्वभावासाठी जगभर प्रसिद्ध आहेत.
जर तुमच्याकडे आधीपासूनच मांजर असेल विशेषत: काळी तर आजचा दिवस तिच्या नावाने खास ठरवू शकता. तिला नवीन खेळणी, स्वादिष्ट खाऊ द्या, थोडा वेळ खेळण्यात किंवा तिचं पोट कुरवाळण्यात घालवा. पाळीव प्राणी आपल्याला दररोज नि:स्वार्थ प्रेम देतात, आज ते प्रेम परत करण्याचा दिवस आहे. जर तुम्ही मांजर घेण्याचा विचार करत असाल, तर आजच योग्य क्षण आहे. आश्रयस्थानांत शेकडो काळ्या मांजरींना घराची गरज आहे. दत्तक घेतल्याने केवळ एका प्राण्याचं आयुष्य बदलत नाही, तर तुमच्या आयुष्यात आनंदही येतो. आणि जर तुम्हाला मांजर पाळणं शक्य नसेल, तरी स्थानिक प्राणीसंवर्धन केंद्राला छोटीशी देणगी द्या. तुमचं थोडं सहकार्य अनेक जीवांना आश्रय देऊ शकतं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : थायलंडच्या सिंहासनाची वारसदार ‘Sleeping Princess’ची जीवासाठी झुंज; 2022 पासून कोमात, आता ओढवले एक नवीन संकट
काळ्या मांजरींबद्दल असलेल्या अंधश्रद्धा ही केवळ इतिहासातील भीतीची परंपरा आहे. प्रत्यक्षात त्यांचं रूप, त्यांची खेळकरता आणि प्रेमळ स्वभाव हा आयुष्यातील सौंदर्याचा अनुभव देणारा असतो. या ‘नॅशनल ब्लॅक कॅट अॅप्रिसिएशन डे’ निमित्त, अंधश्रद्धा बाजूला ठेवून या खास प्राण्याचा सन्मान करण्याची ही योग्य वेळ आहे.