
Wildlife Conservation Day World Wildlife Day 2025 Join the global effort to protect nature
जागतिक वन्यजीव दिनाची मुहूर्तमेढ २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने रोवली आणि १९७३ मध्ये या दिवशीच CITES अर्थात ‘धोक्यात आलेल्या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराविरुद्ध करार’ (Convention on International Trade in Endangered Species) वर स्वाक्षरी करण्यात आली होती, म्हणून ३ मार्च हा दिवस निवडण्यात आला. हा करार वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी आयतिहासिक मानला जातो. आज हा करार १८० हून अधिक देशांनी स्वीकारलेला असून, लाखो प्रजातींच्या संरक्षणात तो महत्वाची भूमिका बजावत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Politics: पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला
वन्यजीव आणि वनस्पती केवळ सौंदर्याचा भाग नसून पृथ्वीवरील जैविक साखळीचे ते अत्यावश्यक घटक आहेत. अन्नसाखळी संतुलित ठेवणे, वातावरणातील ऑक्सिजन-कार्बनचे प्रमाण नियंत्रित करणे, मातीची सुपीकता टिकवणे, जलचक्र सुरळीत ठेवणे आणि मानवी आरोग्यासाठी आवश्यक औषधी वनस्पती पुरवणे, अशी महत्त्वाची कामगिरी ही जैवविविधता करत असते. मात्र, गेल्या काही दशकांत मानवाने केलेली जंगलतोड, औद्योगिक प्रदूषण, अनियंत्रित नागरीकरण, हवामान बदल आणि बेकायदेशीर शिकारी यामुळे हजारो प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक प्राणी आणि पक्षी आज नामशेष झाले असून अनेक धोक्याच्या यादीत आहेत.
२०२५ ची थीम आर्थिक बाबीकडे लक्ष वेधते, कारण संवर्धनासाठी केवळ भावनाच नव्हे तर भक्कम अर्थसंकल्प, गुंतवणूक आणि शाश्वत धोरणांची गरज आहे. जंगलसंवर्धन, अभयारण्ये, पुनर्वसन प्रकल्प, आदिवासी आणि स्थानिक समुदायांशी सहकार्य, तसेच पर्यावरणाशी सुसंगत पर्यटन यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ आवश्यक आहे. सरकारे, खासगी संस्था, स्वयंसेवी संघटना आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन या दिशेने योगदान देणे ही काळाची गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SSB Alert : India-Nepal सीमेवर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; घुसखोरांना रोखण्यासाठी दोन्ही देशाने घेतला ‘हा’ कठोर निर्णय
जागतिक वन्यजीव दिन आपल्याला वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करून देतो. प्लास्टिकचा वापर टाळणे, झाडे लावणे, पर्यावरणपूरक वस्तू वापरणे, अवैध वन्यजीव व्यापाराविरोधात आवाज उठवणे आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करणे, ही काही सोपी पण प्रभावी पावले आपण उचलू शकतो. पृथ्वी ही केवळ आपली नसून येणाऱ्या पिढ्यांचीही आहे, ही जाणीव बाळगूनच आपण निसर्गाशी सुसंवाद साधला पाहिजे.
थोडक्यात सांगायचे झाले, तर जागतिक वन्यजीव दिन २०२५ हा एक उत्सव नसून तो एक इशारा आहे – निसर्गाचे संरक्षण हे पर्याय नसून अपरिहार्य जबाबदारी आहे. जर आज आपण गुंतवणूक केली नाही, तर उद्या केवळ पश्चात्ताप उरेल. वन्यजीवांचे संरक्षण म्हणजे प्रत्यक्षात मानवजातीचेच संरक्षण आहे.
Ans: दरवर्षी ३ मार्च रोजी.
Ans: “वन्यजीव संवर्धन वित्त: लोक आणि ग्रहात गुंतवणूक”.
Ans: वन्यप्राणी, जैवविविधता आणि पृथ्वीचे भविष्य वाचवण्यासाठी.