घुसखोरांना सीमा ओलांडण्यापासून रोखण्यासाठी नेपाळ आणि भारताने घेतला एक मोठा निर्णय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India Nepal border security : भारत–नेपाळ (India-Nepal) ही सुमारे १,८८० किलोमीटर लांबीची खुली सीमा केवळ व्यापार आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठीच नाही, तर अनेक वर्षांपासून सामाजिक आणि आर्थिक नात्यांचे प्रतीक राहिली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत या खुल्या सीमेचा गैरवापर करून काही परदेशी नागरिक भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषतः पाकिस्तान, चीन आणि ब्रिटनशी संबंधित काही नागरिक नेपाळमार्गे भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळल्यानंतर, दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर भारत आणि नेपाळने सीमा सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. संयुक्त पाळत ठेवणे, अधिक चौक्या सक्रिय करणे, गुप्तचर माहिती जलदगतीने शेअर करणे आणि संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई करणे, असा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असा स्पष्ट संकेत दोन्ही देशांनी दिला आहे.
१५ नोव्हेंबर रोजी विशेष सुरक्षा दलाने (SSB) नेपाळ सीमेवरून दोन ब्रिटिश नागरिकांना अटक केली होती. त्यापैकी एक व्यक्ती पाकिस्तानी वंशाचा असल्याचे तपासात समोर आले. तसेच, काही चिनी नागरिक देखील नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या घटनांमुळे सीमा सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Politics: पाकिस्तानात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे; PM शरीफांनी राजकारणाचा फास मुनीरभोवती घट्ट आवळला
भारतीय कायद्यानुसार, कोणताही परदेशी नागरिक व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश करत असेल, तर त्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ₹५,००,००० पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. नुकतेच बहराइच येथे अटक करण्यात आलेल्या एका चिनी महिलेला न्यायालयाने आठ वर्षांचा तुरुंगवास आणि ₹५०,००० दंड ठोठावला आहे. यामुळे भारत सरकार या प्रकरणांकडे किती गांभीर्याने पाहत आहे, हे अधोरेखित झाले आहे.
🚨 BIG! A Chinese national was ARRESTED at the Indo-Nepal border with a Pakistani visa, while trying to enter India ILLEGALLY. 👉 SSB detained him during checking — He was carrying multiple passports, phones, and documents from China, Pakistan, Nepal & Vietnam. pic.twitter.com/ZWcjr9ogNq — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) November 25, 2025
credit : social media and Twitter
नेपाळमध्येही नियम कडक आहेत. इमिग्रेशन कायदा २०४९ नुसार, विनाअनुमती देशात प्रवेश केल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास आणि ₹५०,००० पर्यंत दंडाची तरतूद आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाचे संयुक्त प्रवक्ते रवींद्र आचार्य यांनी सांगितले की, दोन्ही देश संयुक्तरित्या सीमा पाळत वाढवणार असून, सीमा ओलांडणाऱ्या प्रत्येक परदेशी व्यक्तीचा संपूर्ण रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. स्थानिक स्तरावर माहिती संकलनासाठी पोलीस व सुरक्षा यंत्रणांचे नेटवर्क अधिक मजबूत करण्यात येणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : K visa : चीनने जगभरातील बुद्धिमान लोकांवर लावली बोली; मोफत घरे, चांगले पगार आणि मोठा निधी देण्याचा नेमका हेतू काय?
नैसर्गिक दृष्ट्या मैत्रीपूर्ण आणि खुली असलेली ही सीमा आता ड्रग्ज तस्करी, मानवी तस्करी, बनावट कागदपत्रे आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या नेटवर्कसाठी वापरली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. त्यामुळेच ‘खुली सीमा, पण कडक नजर’ हे नवीन धोरण उघडपणे स्वीकारण्यात आले आहे. २५० हून अधिक चौक्यांवर सुमारे ९,००० पेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह सीमा निरीक्षण करण्यात येणार आहे. भारत-नेपाळमधील दीर्घकालीन मैत्री अबाधित राहील, मात्र सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही शिथिलता ठेवली जाणार नाही, हे या निर्णयातून स्पष्ट होते. आगामी काळात या संयुक्त उपाययोजनांमुळे सीमा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुस्थितीत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Ans: वाढत्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे.
Ans: ५ वर्षांचा तुरुंगवास आणि मोठा दंड.
Ans: संयुक्त पाळत, रेकॉर्ड ठेवणे आणि जलद गुप्तचर शेअरिंग.






