
मुस्लिम समाजाची ओळख 'हिरवा रंगच' का? (Photo Credit- X)
हा रंग धार्मिक मान्यतेतून आलेला आहे की यामागे विज्ञानही आहे, इस्लाम धर्मातील हिरव्या रंगाचे संदर्भ म्हणजेच प्रेषितांना तीन रंग आवडायचे. पांढरा रंग इस्लाम धर्मात मूळ पांढऱ्या रंगाचा झेंडा होता. तपकिरी रंग म्हणून प्रेषितांच्या पागोट्यांचा रंग हा तपकिरी होता आणि त्यासोबतच हिरवा रंग सुद्धा त्यांना आवडायचा. मक्का आणि मदिना स्थित जे म्युझियम आहे त्यामध्ये प्रेषितांच्या पागोट्यांचा जो रंग आहे तो हिरवा आहे. याला अमामा असं म्हणतात. टर्कीची जी खिलाफत झाली त्यानंतर त्यांचं अरब राज्यांवर राज्य होतं. तेव्हा त्या राज्यकर्त्यांनी तिथल्या मशिदींवर घुमट बांधला. त्या आधी मशिदींवर घुमट नव्हता.
सहर म्हणजे सौंदर्याचा कहर! ‘क्यो? इन आँखो से कैसे फसाया?’
मदिना इथं जी मशीद आहे आणि त्या बाजूला पैगंबरांची जी समाधी आहे, त्यावर घुमट बांधण्यात आला. त्या घुमटाला हिरवा रंग देण्यात आला. तेव्हापासून जगभरामध्ये अनेक मशिदींच्या घुमटाचा रंग हा हिरवा करण्यात आला. त्यानंतर मुस्लिम देश जसे की पाकिस्तान, सौदी अरब, बांगलादेश यांनी आपल्या झेंड्यात हिरव्या रंगाचा वापर केला. मदिने मधला मस्जिद ए नब्बी इस्लाममधील सर्वात पवित्र मस्जिदपैकी एक आहे. ही मस्जिद स्वतः पैगंबर मोहम्मद यांनी स्थापली. आज या मशिदीचा हिरवा घुमट जगभर ओळखला जातो.
धार्मिक मान्यतांपुरतंच नाही तर विज्ञानातही हिरव्या रंगांबद्दल ठोस कारणं आहेत. हिरवा रंग व्हिज्युअल स्पेक्ट्रम मध्ये पाचशे वीस ते पाचशे सत्तर नॅनोमीटर तरंगलांबी मध्ये येतो. ही तरंगलांबी मानवी डोळ्यांसाठी सर्वात आरामदायक मानली जाते. हिरवा प्रकाश ग्रहण करणं अधिक प्रभावी असतं, ज्यामुळे डोळ्यांवर ताण कमी पडतो. म्हणूनच हिरवा रंग शांत, संतुलित आणि प्रसन्न वाटतो.
तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्लाम धर्माचा एकमेव अधिकृत असा कोणताही झेंडा नाही. इतिहासात वेगवेगळ्या खिलाफतींनी वेगवेगळे रंग वापरले, पण पैगंबरांची परंपरा, मस्जिद ए नब्बी आणि सांस्कृतिक स्वीकार यामुळे हिरवा रंग इस्लाम सोबत घट्ट जोडला गेला. तसा इस्लाम धर्मग्रंथ कुराण किंवा हदीस यामध्ये हिरवा रंग हाच इस्लामचा प्रतीक असा वगैरे काहीही उल्लेख नाहीये. आज पाकिस्तान, सौदी अरेबिया, बांगलादेश सारख्या देशांच्या झेंड्यामध्ये हिरवा रंग प्रमुख आहे. तर निष्कर्ष हा स्पष्ट आहे, हिरवा रंग मुस्लिम समाजाला कुणी दिलेला नाही तर तो धर्म, इतिहास, संस्कृती आणि विज्ञान या सगळ्यांच्या संगमातून स्वीकारला गेलाय.
“मुंब्रा हिरवे करण्याचा उद्देश राजकीयच…”, किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर Sahar Sheikh यांचा माफीनामा