Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Afro Day 2026 : ॲफ्रो केशभूषा केवळ फॅशन नाही, तर इतिहास आणि स्वातंत्र्याचे प्रतीक; जाणून घ्या ‘याचा’ रंजक इतिहास

World Afro Day : जागतिक ॲफ्रो दिन दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस आफ्रिकन वंशाच्या लोकांच्या नैसर्गिक केसांचा आणि सांस्कृतिक ओळखीचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. ॲफ्रो केशभूषा केवळ सौंदर्याचे प्रतीक नाही, तर आत्मसन्मान, स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक वारशाचेही प्रतीक आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 15, 2026 | 09:30 AM
World Afro Day World Afro Day history Afro hair discrimination

World Afro Day World Afro Day history Afro hair discrimination

Follow Us
Follow Us:
  • सांस्कृतिक स्वाभिमान
  • भेदभावाविरुद्ध लढा
  • जागतिक चळवळ

सौंदर्य म्हणजे काय? गोरा रंग आणि सरळ, लांबसडक केस म्हणजे सौंदर्य की निसर्गाने दिलेली आपली मूळ ओळख म्हणजे खरी सुंदरता? या प्रश्नाचे उत्तर देत, स्वतःच्या नैसर्गिक अस्तित्वाचा आणि वारशाचा ताठ मानेने स्वीकार करण्याचा संदेश देणारा दिवस म्हणजे ‘जागतिक ॲफ्रो दिन’ (World Afro Day). दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी जगभरात हा दिवस आफ्रिकन वंशाच्या लोकांच्या नैसर्गिक केसांचा (Afro Hair), त्यांच्या अनन्यसाधारण संस्कृतीचा आणि आत्मसन्मानाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.

ॲफ्रो केशभूषा ही केवळ एक फॅशन किंवा स्टाईल नाही, तर तो एका संपूर्ण जनसमुदायाचा इतिहास, त्यांचा संघर्ष आणि स्वातंत्र्याकांक्षा व्यक्त करणारा जिवंत वारसा आहे. आजच्या काळात जेव्हा सौंदर्यशास्त्र आणि कॉर्पोरेट जगातील मानके पश्चिमेत्य आदर्शांभोवती फिरतात, तेव्हा स्वतःच्या कुरळ्या, घनदाट आणि नैसर्गिक केसांचा सन्मान करणे हा एक क्रांतिकारी विचार ठरतो.

इतिहासातील संघर्ष आणि स्वातंत्र्याचे प्रतीक

ॲफ्रो केसांचा इतिहास केवळ सौंदर्याशी जोडलेला नसून, तो वांशिक संघर्ष आणि मानवाधिकार चळवळींशी खोलवर जोडलेला आहे. शतकानुशतके आफ्रिकन आणि आफ्रिकन-अमेरिकन लोकांना त्यांच्या नैसर्गिक केसांच्या पोतामुळे (Hair Texture) हीन दर्जाची वागणूक दिली गेली. गुलामगिरीच्या काळात त्यांच्याकडून त्यांची ओळख हिरावून घेण्यासाठी त्यांचे केस कापले जायचे किंवा झाकून ठेवण्यास सक्ती केली जायची.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mexico: वाळवंटात हिरवा चमत्कार; 160 वर्षांनंतर बायसनच्या पुनरागमनाने पुन्हा बहरली मेक्सिकोची परिसंस्था

मात्र, १९६० च्या दशकात अमेरिकेत सुरु झालेल्या ‘ब्लॅक नागरी हक्क चळवळीदरम्यान’ (Civil Rights Movement) ॲफ्रो केशभूषा हे ‘अभिमान आणि स्वातंत्र्याचे’ (Black Pride & Resistance) एक मोठे राजकीय आणि सामाजिक प्रतीक बनले. “ब्लॅक इज ब्युटीफुल” (Black is Beautiful) या घोषणेने जगाचे लक्ष वेधून घेतले आणि स्वतःच्या नैसर्गिक रूपात जगण्याचा अधिकार आफ्रिकन समाजाने जगाला दाखवून दिला.

सामाजिक भेदभाव आणि पूर्वग्रहांना आव्हान

आज २१ व्या शतकातही दुर्दैवाने शाळा, महाविद्यालये, क्रीडा मैदाने आणि कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये ॲफ्रो केसांबद्दल अनेक पूर्वग्रह पाहायला मिळतात. अनेकदा शाळांमध्ये आफ्रिकन मुलांच्या नैसर्गिक केसांना “अस्वच्छ” किंवा “शिस्तभंग” मानले जाते, तर कंपन्यांमध्ये महिलांना त्यांचे नैसर्गिक केस सरळ (Straighten) करण्यासाठी अप्रत्यक्ष दबाव आणला जातो. जागतिक ॲफ्रो दिन या मानसिकतेला थेट आव्हान देतो. या दिवसाची सुरुवात २०१७ मध्ये ब्रिटनमधील मायकेल डेलॉन (Michelle De Leon) यांनी केली. जेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीला स्वतःच्या नैसर्गिक केसांबद्दल न्यूनगंड निर्माण केला जात आहे, तेव्हा त्यांनी या जागतिक चळवळीचा पाया रचला. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाने (UN Human Rights) देखील या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

शाळा, संस्था आणि समुदायांमधील उपक्रम

जागतिक ॲफ्रो दिनानिमित्त जगभरातील शाळांमध्ये ‘बिग हेअर असेंब्ली’ (Big Hair Assembly) सारखे शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये लहान मुलांना त्यांच्या नैसर्गिक केसांचे महत्त्व पटवून दिले जाते, जेणेकरून त्यांच्यात लहानपणापासूनच आत्मसन्मान आणि इतर संस्कृतींबद्दल आदराची भावना निर्माण व्हावी. तसेच विविध संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र आणि सामाजिक गटांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. केसांवरून होणारा भेदभाव रोखण्यासाठी कायदे (उदा. अमेरिकेतील CROWN Act) तयार करण्यावर या दिवशी भर दिला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ganga Aarti : सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा डंका; लंडनच्या टेम्स नदीवर पहिल्यांदाच रंगला भव्य गंगा आरती सोहळा

मानवता, समानता आणि आत्मसन्मानाचा संदेश

हा दिवस केवळ आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठीच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी एक धडा आहे. निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वंशाला एक वेगळे सौंदर्य आणि वैशिष्ट्य दिले आहे. कोणालाही त्यांच्या शारीरिक रचनेवरून, त्वचेच्या रंगावरून किंवा केसांच्या पोतावरून पारखणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

जागतिक ॲफ्रो दिन आपल्याला हीच आठवण करून देतो की, विविधता हेच या जगाचे खरे सौंदर्य आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या ओळखीवर प्रेम केले पाहिजे आणि इतरांच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. हा दिवस खऱ्या अर्थाने समानता, बंधुता आणि आत्मसन्मानाचे वैश्विक प्रतीक बनला आहे.

Web Title: World afro day history significance and celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

Engineers Day 2026: पुण्याच्या COEP मधून शिकलेला ‘हा’ मुलगा कसा बनला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअर? जाणून घ्या
1

Engineers Day 2026: पुण्याच्या COEP मधून शिकलेला ‘हा’ मुलगा कसा बनला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअर? जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीला बाप्पा आणि मोरिया का म्हटले जाते? जाणून घ्या यामागील 600 वर्षे जुनी रंजक कथा आणि इतिहास
2

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीला बाप्पा आणि मोरिया का म्हटले जाते? जाणून घ्या यामागील 600 वर्षे जुनी रंजक कथा आणि इतिहास

Hindi Diwas 2026 : ‘संविधान सभा ते आधुनिक भारत…’ जाणून घ्या हिंदी भाषेचा रंजक प्रवास आणि तिचे महत्त्व
3

Hindi Diwas 2026 : ‘संविधान सभा ते आधुनिक भारत…’ जाणून घ्या हिंदी भाषेचा रंजक प्रवास आणि तिचे महत्त्व

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
4

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.