Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Laughter Day 2025: फक्त 60 मिनिटे हसल्याने होतात 400 कॅलरीज बर्न; जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

World Laughter Day 2025 : आज 4 मे 2025  याचदिवशी जगभरात जागतिक हास्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 04, 2025 | 08:45 AM
World Laughter Day 2025 Laughing 1 hour burns 400 calories boosts health

World Laughter Day 2025 Laughing 1 hour burns 400 calories boosts health

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – आज ४ मे २०२५  याचदिवशी जगभरात जागतिक हास्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. यामागचा उद्देश फक्त हसवणे नाही, तर लोकांच्या जीवनात मानसिक, शारीरिक आणि सामाजिक सकारात्मकता वाढवणे हा आहे. तणावग्रस्त जीवनशैलीत हास्य हे एक प्रभावी औषध ठरू शकते, असा संदेश या दिनानिमित्त दिला जातो.

हास्य दिनाची सुरुवात भारतातून!

जागतिक हास्य दिनाची संकल्पना भारतात जन्माला आली. १९९८ मध्ये डॉ. मदन कटारिया यांनी मुंबईत पहिला हास्य दिन साजरा केला. फक्त १२ लोकांपासून सुरू झालेला हा उपक्रम आज जगभरातील शेकडो शहरांमध्ये पोहोचला आहे. डॉ. कटारिया यांना हास्य योगाचे जनक मानले जाते. त्यांचा उद्देश हास्याद्वारे जगात शांती, एकोपा आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे हा होता.

हे देखील वाचा : International Firefighters’ Day : कोण आहेत भारताच्या पहिल्या महिला अग्निशामक? वाचा त्यांची प्रेरणादायक कहाणी

हसण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

  • तणाव दूर करतो: फक्त १० मिनिटांचे हसणे तणावाचे प्रमाण ६०% कमी करू शकते. हसल्याने एंडोर्फिन नावाचे आनंददायक संप्रेरक वाढते, ज्यामुळे चिंता, राग आणि नैराश्य दूर होते.

  • हृदय निरोगी राहते: नियमित हास्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात, आणि त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

  • चेहऱ्यावर तेज येते: हसल्याने चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो, ज्यामुळे त्वचेत चमक आणि उत्साही भाव दिसून येतात.

  • नात्यांमध्ये गोडवा वाढतो: एकत्र हसल्याने माणसांमधील संबंध दृढ होतात, आणि सकारात्मक संवाद निर्माण होतो.

हास्याशी संबंधित मनोरंजक तथ्ये

  • संशोधनानुसार मुले दिवसातून ३०० वेळा हसतात, तर प्रौढ फक्त १०-१५ वेळा. हे दर्शवते की मोठे होताना आपण हास्य हरवत जातो.

  • हसणे मेंदूसाठी फायदेशीर आहे. हसताना मेंदूमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, जे लक्ष केंद्रीत करणे आणि विचारशक्ती सुधारण्यास मदत करते.

  • दररोज हसणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.

  • १०-१५ मिनिटांचे हसणे हे ट्रेडमिलवर १० मिनिटे चालण्यासारखे आहे. विशेषतः, एक तास हसल्यास सुमारे ४०० कॅलरीज बर्न होतात.

  • हास्य संसर्गजन्य असते. एक व्यक्ती हसल्यास आजूबाजूचे लोकही आपोआप हसतात.

  • बनावट हास्य देखील फायदेशीर असते. मेंदू त्याला खरी प्रतिक्रिया मानतो आणि तेवढेच फायदे देतो.

  • अनेक प्राणी देखील हसतात – चिंपांझी, डॉल्फिन, माकडे, कुत्रे यांच्यात हसण्याचे स्वरूप आढळते. उंदीर गुदगुल्या केल्यावर अल्ट्रासोनिक हास्य व्यक्त करतात, जे मानवी कानांना ऐकू येत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : What Is Western Disturbance : नक्की काय आहे हा ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’? ज्यामुळेच भारतात पडतो पाऊस

हास्य दिन साजरा करण्याचे मार्ग

  • मित्र-परिवारासोबत विनोदी चित्रपट पाहणे.

  • हास्य योग सत्रात भाग घेणे.

  • मुलांसोबत वेळ घालवणे, त्यांच्या सहवासात निखळ हास्य अनुभवणे.

जगभरातील तणावपूर्ण वातावरणात, हास्य ही एक सशक्त, मोफत आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय मिळणारी औषध आहे. जागतिक हास्य दिन २०२५ च्या निमित्ताने, आपण आपल्या जीवनात हसण्याचे क्षण अधिक निर्माण करायला हवेत. कारण – हसणे म्हणजे जगणे!

Web Title: World laughter day 2025 laughing 1 hour burns 400 calories boosts health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • laughter chefs
  • lifestyle news
  • special story

संबंधित बातम्या

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
1

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
2

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato
3

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!
4

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.