जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी कुठे आणि कधी झाली होती माहीत आहे का
जर तुम्ही काही मिनिटांसाठी ट्रॅफिक जॅममध्ये अडकलात तर थोड्याच वेळात अस्वस्थ वाटू लागते, तर 12 दिवस हीच अवस्था कायम राहिल्यास तुम्हाला कसे वाटेल याची कल्पना करा. याचा विचार करूनही अंगावर शहारे येतात आणि डोकं भणभणते. पण हे प्रत्यक्षात घडले आहे. आता असा ट्रॅफिक जाम नक्की कुठे लागला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर 12 दिवसांचा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक जाम लोकांनी अनुभवला आहे.
यावेळी वाहने अजिबात जाऊ शकली नाहीत अशा प्रकारे लोक जाममध्ये अडकून राहिले. जणू त्या जंजाळात लोकांचा जीव अडकला होता. संपूर्ण शहर ठप्प झाले. जाम एवढा होता की तो सोडविण्यासाठी12 दिवस लागले (फोटो सौजन्य – iStock)
कुठे लागला होता ट्रॅफिक जाम
2010 मध्ये चीनची राजधानी बीजिंगमध्ये जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बीजिंग-तिबेट एक्स्प्रेस वेवर ज्याला चीन नॅशनल हायवे 110 असे म्हटले जाते. या ठिकाणी अशी ट्रॅफिक जॅम होती जी संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. जवळपास 100 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होता आणि जाम झाला होता. वाहने आणि वाहनांमध्ये बसलेले लोक 12 दिवस रस्त्यावर अडकून पडले होते. हा जाम संपूर्ण जगाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात लांब जाम मानला गेला आहे. नजर जाईल तिथपर्यंत फक्त वाहने दिसत होती अशी परिस्थिती उद्भवली होती.
कधी घडली होती घटना?
14 ऑगस्ट 2010 रोजी बीजिंग-तिबेट द्रुतगती मार्गावर जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी इतकी मोठी होता की 12 दिवस लोक वाहनांमध्ये अडकले होते. तिथेच खाल्लं, प्यायलं आणि ट्रॅफिक जॅममध्येच लोकांना झोपावं लागलं होतं. लोकांची वाहनेही हलत नव्हती. वाहनांचे हॉर्न ऐकू येत होते आणि वाहनांच्या लांबलचक रांगा इतकंच दिसत होतं.
का झाली होती वाहतूक कोंडी
ही वाहतूक कोंडी 100 किमी लांब होती. मंगोलियाहून बीजिंगला कोळसा आणि बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे ही वाहतूक कोंडी झाली होती की सर्व काही ठप्प झाले होते. बीजिंग-तिबेट एक्स्प्रेस वे चे बांधकाम त्यावेळी चालू होते. त्यामुळे वाहने जाऊ शकली नाहीत. द्रुतगती मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक एकेरी करण्यात आली. मंगोलियाहून बीजिंगला बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकने बीजिंगमधून बाहेर पडण्याचा मार्ग रोखला होता. अवघ्या काही वेळातच जाम इतका लांबला की प्रशासनाला जाम हटवायला 12 दिवस लागले.
एक्सप्रेसवे नुकताच बांधला जात होता आणि मंगोलियातून कोळसा घेऊन येणाऱ्या ट्रकचा ताफा रस्त्यावरून जाऊ शकत नव्हता. अनेक वाहनेही तुटल्याने रस्ता ठप्प झाला होता. हा जाम इतका होता की तिथे अडकलेली वाहने एका दिवसात केवळ 1 किलोमीटरचे अंतर पार करू शकली.
चौपट भावाने विकले गेले पदार्थ
हा जाम इतका काळ चालला की, वाहनांची जत्रा पाहिल्यानंतर एक्स्प्रेस वे च्या बाजूला गाड्या आणि छोट्या वाहनांनी तात्पुरती घरे बांधली गेली. फराळ, शीतपेये, नूडल्स, खाद्यपदार्थ चौपट भावाने विकले जाऊ लागले. लोकांना 10 पट दराने पाणी विकत घ्यावे लागले होते आणि अनेकांना या काळात त्रास झाला होताट
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रशासनाने या मार्गावरील सर्व रस्ते अडवले. यामध्ये अडकलेल्या ट्रकची प्रथम सुटका करण्यात आली. तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस काम करण्यात आले, पण अखेर 26 ऑगस्ट 2010 रोजी जगातील सर्वात मोठी वाहतूक कोंडी संपली.