Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Speech Day: शब्दांत असते जग बदलण्याची ताकद! 15 मार्चला का साजरा होतो ‘जागतिक भाषण दिन’? जाणून घ्या रंजक इतिहास

World Speech Day 2026 : दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक भाषण दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश भाषण आणि सार्वजनिक भाषणाचे महत्त्व ओळखणे आणि प्रोत्साहन देणे आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 15, 2026 | 05:30 AM
world speech day 2026 history importance simon gibson marathi news public speaking

world speech day 2026 history importance simon gibson marathi news public speaking

Follow Us
Follow Us:
  • शब्दांचे सामर्थ्य
  • सायमन गिब्सन यांची संकल्पना
  • तरुणांसाठी संधी

World Speech Day 2026 Marathi : “शब्दांच्या जोरावर आपण युद्ध जिंकू शकतो आणि शब्दांच्याच जोरावर आपण शांतताही प्रस्थापित करू शकतो.” हे वाक्य आजच्या काळात अत्यंत समर्पक ठरते. उद्या, १५ मार्च रोजी संपूर्ण जग ‘जागतिक भाषण दिन’ (World Speech Day) साजरा करत आहे. हा दिवस केवळ व्यासपीठावर उभं राहून बोलण्याचा नाही, तर आपल्या मनातील विचारांना दिशा देऊन समाजाला सकारात्मक वळण लावण्याचा आहे.

जागतिक भाषण दिनाचा रंजक इतिहास

जागतिक भाषण दिनाची सुरुवात फार जुनी नाही, मात्र त्याचा प्रभाव प्रचंड आहे. २०१५ मध्ये अथेन्स लोकशाही मंचावर सायमन गिब्सन यांनी या दिवसाची संकल्पना मांडली. गिब्सन यांना विश्वास होता की, जगातील सर्वात मोठे बदल हे तलवारीने नाही तर प्रभावी भाषणांनी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर किंवा महात्मा गांधी या सर्व महापुरुषांनी आपल्या शब्दांच्या जोरावरच जनसामान्यांची मने जिंकली होती. हीच परंपरा पुढे नेण्यासाठी सायमन गिब्सन यांनी जागतिक स्तरावर या दिवसाची स्थापना केली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Diplomacy: इराणची भारताला मोठी ‘ऑफर’; होर्मुझमधून मार्ग मोकळा, पण PM मोदींना घ्यावा लागणार ‘हा’ मोठा निर्णय

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नेतृत्वाचा विकास

आजच्या धावपळीच्या युगात संवाद हरवत चालला आहे. अशा वेळी ‘जागतिक भाषण दिन’ आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आठवण करून देतो. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उद्याच्या दिवशी भाषण स्पर्धा, वादविवाद आणि वक्तृत्व कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे केवळ बोलण्याची भीती (Stage Freight) जात नाही, तर तरुणांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास होतो. आपला मुद्दा प्रभावीपणे कसा मांडायचा, समोरच्या व्यक्तीला आपल्या विचारांशी कसे सहमत करायचे, हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी हा दिवस एक सुवर्णसंधी आहे.

#WorldSpeechDay @RailMinIndia @nerailwaygkp @PibLucknow @gmner_gkp pic.twitter.com/Ml3KsXqmWl — DRM LUCKNOW NER (@drmljn) March 15, 2023

credit – social media and Twitter

डिजिटल प्लॅटफॉर्मवर विचारांचा जागर

तंत्रज्ञानाच्या या युगात आता भाषणे केवळ प्रत्यक्ष व्यासपीठापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. सोशल मीडिया, यूट्यूब आणि पॉडकास्टच्या माध्यमातून सामान्य माणूसही आपले विचार कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जागतिक भाषण दिनानिमित्त जगभरातील लोक आपले व्हिडिओ रेकॉर्ड करून डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. यातून अनेकदा अशा समस्यांवर प्रकाश टाकला जातो ज्याकडे मुख्य प्रवाहातील माध्यमांचे दुर्लक्ष होते. “शब्दांना सीमा नसतात” हेच यातून सिद्ध होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Missile City: इराणकडे आहे अंडरवर्ल्ड मृत्यू पेरणाऱ्या क्षेपणास्त्रांचा गुप्त अड्डा; अमेरिकन नौदलासाठी ठरणार आव्हान

शब्दांनी घडू शकतो बदल: आपल्याला काय शिकवतो हा दिवस?

जागतिक भाषण दिन आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो तुमचा आवाज महत्त्वाचा आहे. समाजात होणारा अन्याय असो किंवा पर्यावरणाचा प्रश्न, जेव्हा आपण त्याबद्दल बोलतो, तेव्हाच बदलाची प्रक्रिया सुरू होते. प्रभावी संवाद हे केवळ करिअरसाठी आवश्यक नाही, तर ते एक चांगले नागरिक बनण्यासाठीही तितकेच गरजेचे आहे. प्रेरणादायी भाषणे ही निराश झालेल्या मनाला नवी उमेद देऊ शकतात आणि विखुरलेल्या समाजाला एकत्र आणू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक भाषण दिन (World Speech Day) कधी साजरा केला जातो?

    Ans: दरवर्षी १५ मार्च रोजी जागतिक स्तरावर 'जागतिक भाषण दिन' साजरा केला जातो.

  • Que: या दिवसाची सुरुवात कोणी आणि कधी केली?

    Ans: या दिवसाची स्थापना सायमन गिब्सन यांनी २०१५ मध्ये केली होती.

  • Que: जागतिक भाषण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: भाषणांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करणे, संवाद कौशल्याला प्रोत्साहन देणे आणि सामान्य लोकांच्या आवाजाला व्यासपीठ मिळवून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

Web Title: World speech day 2026 history importance simon gibson marathi news public speaking

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला
1

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला

World Rainforest Day 2026: दर मिनिटाला नष्ट होत आहेत 40 फुटबॉल मैदानाएवढी जंगले; ‘पृथ्वीची फुफ्फुसे’ वाचवण्यासाठी आजच व्हा सतर्क
2

World Rainforest Day 2026: दर मिनिटाला नष्ट होत आहेत 40 फुटबॉल मैदानाएवढी जंगले; ‘पृथ्वीची फुफ्फुसे’ वाचवण्यासाठी आजच व्हा सतर्क

World Giraffe Day : वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि जगातील सर्वात उंच प्राणी; जाणून घ्या ‘जागतिक जिराफ दिन’ का आहे खास
3

World Giraffe Day : वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि जगातील सर्वात उंच प्राणी; जाणून घ्या ‘जागतिक जिराफ दिन’ का आहे खास

International Yoga Day: PM मोदींच्या ‘त्या’ एका प्रस्तावाने इतिहास रचला! पाहा 177 देशांच्या पाठिंब्याने योग कसा बनला जागतिक उत्सव?
4

International Yoga Day: PM मोदींच्या ‘त्या’ एका प्रस्तावाने इतिहास रचला! पाहा 177 देशांच्या पाठिंब्याने योग कसा बनला जागतिक उत्सव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.