
WPL 2026: Harmanpreet Kaur made history! She became the first player in the world to achieve this feat.
Harmanpreet Kaur created history in the WPL : काल महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स सामन्यात मुंबईने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या वादळी शतकाच्या जोरावर गुजरात जायंट्सने दिलेले १९३ धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि स्पर्धेतील दूसरा विजय मिळवला. कौरने या सामन्यात नाबाद ७१ धावा केल्या. या खेळीसह हरमनप्रीत कौरने एक मोठी कामगिरी देखील केली.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि दिग्गज फलंदाज हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात १,००० धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. स्पर्धेत १,००० धावा करणारी ती जगातील दुसरीच खेळाडू देखील ठरली आहे. तसेच, स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके करणारी ती जगातील पहिलीच महिला खेळाडू देखील ठरली आहे.
हरमनप्रीत कौरला ही किमया साधण्यासाठी ५५ धावांची आवश्यकता होती. महिला प्रीमियर लीग २०२६ च्या सहाव्या सामन्यात, गुजरात जायंट्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा मुंबई इंडियन्स मैदानात उतरली, तेव्हा हरमनप्रीतने अर्धशतकी खेळी करत ही कामगिरी केली. सामन्याच्या १८ व्या षटकात, ५४ धावांवर फलंदाजी करत असताना, तिने षटकाच्या पाचव्या चेंडूवर राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर एक शानदार चौकार लागवला. या चार धावांसह, तिच्या एकूण धावसंख्येचा आकडा १००३ वर जाऊन पोहोचला आणि तिने महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरण्याची कामगिरी केली.
यापूर्वी, हा महिला प्रीमियर लीग मध्ये १००० धावा करण्याचा पराक्रम नॅट सायव्हर ब्रंटने केला असून मुंबई इंडियन्सकडून खेळताना, नॅट सायव्हर ब्रंटने ३१ सामन्यांमध्ये ११०१ धावा फटकावल्या आहेत. या काळात तिची सर्वोच्च धावसंख्या ८० नाबाद राहिली आहे. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर आता या यादीत दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचली आहे.
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ३०म हिला प्रीमियर लीग सामन्यांमध्ये हरमनने १० अर्धशतके झळकवण्याचा पराक्रम केला आहे. तिची मुंबई इंडियन्सची सहकारी नॅट सायव्हर-ब्रंट आणि यूपी वॉरियर्सची कर्णधार मेग लॅनिंग प्रत्येकी नऊ अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानी आहेत. हरमनप्रीतने या एकाच सामन्यात दोन विक्रमांची नोंद केली आहे. एक म्हणजे WPL मध्ये तिचे १० वे अर्धशतक झळकावल्यानंतर, हरमन WPL मध्ये १००० धावा करणारी पहिली भारतीय आणि एकूण दुसरी फलंदाज ठरली आहे.
१९३ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद ७१ धावांच्या जोरावर १९३ धावांचे लक्ष्य गाठले आणि सामना ७ विकेट्सने जिंकला. हरमनप्रीतने ४३ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि २ षटकार मारून नाबाद ७१ धावा केल्या.