15 जानेवारी पासून Under-19 World Cup चा रणसंग्राम(फोटो-सोशल मीडिया)
Indian squad for ICC Under-19 Cricket World Cup : आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेचा रणसंग्राम १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. अंडर-१९ विश्वचषकात सोळा संघ सहभागी असणार आहेत. या संघाना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. अमेरिका, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह गट अ मध्ये भारतीय संघाला देण्यात आले आहे. आपण जाणून घेणार आहोत की, भारतीय संघाचे सामने कधी आणि कुठे खेळले जाणार आहेत.
अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना १५ जानेवारी रोजी अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता झिम्बाब्वेच्या बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे सुरू होणार आहे. भारतीय संघाचा दुसरा सामना १७ जानेवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना झिम्बाब्वेच्या बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे दुपारी १:०० वाजता सुरू होईल. भारत आणि बांगलादेशमधील सध्याची परिस्थिती पाहता, हा सामना रोमांचक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारतीय संघाचा तिसरा लीग स्टेज सामना २४ जानेवारी रोजी बुलावायो येथे न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हा सामन्याची सुरवात देखील दुपारी १:०० वाजता होणार आहे. गटातील अव्वल दोन संघ पुढील टप्प्यासाठी पात्र ठरणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करेल आणि बाद फेरीसाठी पात्रता मिळवेल पात्र ठरेल अशी अपेक्षा आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषकासाठी, भारतीय संघाला अमेरिका, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. गट ब मध्ये पाकिस्तान, स्कॉटलंड, झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. गट क मध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, आयर्लंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. गट ड मध्ये दक्षिण आफ्रिका, टांझानिया, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश करण्यात आला आहे.
२०२६ चा १९ वर्षांखालील विश्वचषक हा विश्वचषकाचा १६ वा हंगाम असणार आहे. मागील १५ हंगामांमध्ये भारतीय संघ सर्वात यशस्वी संघ म्हणून समोर आला आहे. भारतीय संघ पाच वेळा विश्वविजेता राहिला आहे. चॅम्पियन राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने चार वेळा विजेतेपदावर नाव कोरले आहे. पाकिस्तानने दोन वेळा विजेतेपद जिंकले आहे.तर, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश देखील प्रत्येकी एकदा विजेतेपद जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया सध्याचा विजेता संघ असून २०२४ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ७९ धावांनी हरवून जेतेपद पटकावले होते.
हेही वाचा : IND vs NZ : राजकोटमध्ये भारताची आकडेवारी चिंता वाढवणारी! न्यूझीलंड ठरू शकतो वरचढ; वाचा सविस्तर
आयुष म्हात्रे (कर्णधार), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, डी. दीपेश, मोहम्मद अनन, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन ए. पटेल, हरवंश सिंग, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी.






