फोटो सौजन्य - Mumbai Cricket Association (MCA)
T20 Mumbai League auction : आयपीएल 2025 च्या सिझनचा लवकरच शेवट होणार आहे, त्यानंतर मुंबईचे खेळाडू टी२० मुंबई लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. बुधवारी म्हणजच 7 मे रोजी टी-२० मुंबई लीगमध्ये २८० खेळाडू लिलावासाठी येतील तेव्हा उदयोन्मुख स्टार आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी आणि तनुश कोटियन हे आकर्षणाचे केंद्र असणार आहेत. आयपीएलच्या या सिझनमध्ये आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी या खेळाडूंनी कमालीची खेळी खेळली आहे. त्यामुळे यंदा या स्टार खेळाडूंवर फ्रँचायझीच्या नजरा असणार आहेत.
आयपीएलच्या चालू सिझनमध्ये आपल्या प्रभावी कामगिरीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतलेल्या १७ वर्षीय आयुष म्हात्रे व्यतिरिक्त, रघुवंशी, कोटियन आणि मुशीर खान यांनाही मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. या गटात सिद्धेश लाड आणि शम्स मुलानी सारखे खेळाडू देखील आहेत, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. रॅायल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विरूध्द आयुष म्हात्रेने 94 धावांची खेळी खेळली आहे. टी२० मुंबई लीगमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत, यात ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट, वांद्रे ब्लास्टर्स, सोबो मुंबई फाल्कन्स, नॉर्थ मुंबई पँथर्स, एआरसीएस अंधेरी, ईगल ठाणे स्ट्रायकर्स, आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स, मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यासंघाचा समावेश आहे.
🚨 T20 MUMBAI LEAGUE UPDATE 🚨
– Around 280 players in the auction
– Icons players will get 20 Lakh
– Base price of Senior player is 5 Lakh
– Base price of Emerging player is 3 Lakh
– Base price of Development player is 2 LakhAyush Mhatre & Angkrish Raghuvanshi has 5 Lakh as… pic.twitter.com/V5yv42ijpB
— Johns. (@CricCrazyJohns) May 6, 2025
या संघांनी आधीच त्यांच्या संबंधित संघात आयकॉन खेळाडूंची भर घातली आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव (ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट), अजिंक्य रहाणे (वांद्रे ब्लास्टर्स), श्रेयस अय्यर (सोबो मुंबई फाल्कन्स), पृथ्वी शॉ (नॉर्थ मुंबई पँथर्स), शिवम दुबे (एआरसीएस अंधेरी), शार्दुल ठाकूर (ईगल ठाणे स्ट्रायकर्स), सरफराज खान (आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स) आणि तुषार देशपांडे (मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स) यांचा समावेश आहे.
टी२० मुंबई लीग 2025 मध्य सिनियर खेळाडूसाठी ५ लाख रुपये मुळ किंमत असणार आहे, उदयोन्मुख खेळाडूसाठी मुळ किंमत ३ लाख रुपये आणि नव्या खेळाडूसाठी मूळ किंमत २ लाख रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये 8 संघाना 18 सदस्यांना घेणे अनिवार्य आहे. जेव्हा संघ तयार होईल तेव्हा चार वरिष्ठ खेळाडू असणे गरजेचे आहे तर किमान पाच उदयोन्मुख खेळाडू आणि पाच विकास खेळाडूंना संघामध्ये सामील करणे गरजेचे आहे. फ्रँचायझीनी आयकॉन खेळाडूंना २० लाख रुपयात विकत घेतले आहे.