IND vs NZ Final: Rs 5,000 crores at stake in Champions Trophy final; Underworld betting market favors 'this' team to win.
IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघ विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडे गोलंदाजीचे आव्हान असणार आहे. दुबईत दुपारी 2:30 पासून या सामन्याला सुरवात झाली आहे. या सामन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळून ट्रॉफी आपल्या नावे करण्याची शक्यता आहे. अशातच संघांव्यतिरिक्त अनेक बुकीही या अंतिम सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती मिळत आहे. काही रिपोर्ट्सनुसार या महामुकाबल्याच्या अंतिम सामन्यावर 5 हजार कोटी रुपयांचा सट्टा आधीच लावण्यात आला आहे.
दिल्ली पोलिस क्राइम ब्रँचकडून चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान आतापर्यंत 5 हून अधिक बड्या बुकींना पकडण्यात आले आहे. चौकशी दरम्यान त्याचे दुबईशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. हे बुकी अंडरवर्ल्डशी जोडलेले असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. पोलिसांनी सट्टेबाजीत वापरण्यात येणारी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि वस्तूही जप्त केल्या असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा : किंग कोहली खेळणार आज करिअरचा 550 वा सामना, चाहत्यांना फायनलच्या सामन्यात मोठ्या कामगिरीची अपेक्षा
मिळालेल्या वृत्तानुसार, दाऊद इब्राहिमच्या डीआय कंपनी ही दुबईतील मोठ्या क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करण्यात नेहमी गुंतली आहे. अशा मोठ्या सामन्यांच्या वेळी अनेक बडे बुकी शहरांमध्ये हजेरी लावत असतात.
सट्टेबाजीच्या बाजाराच्या अंदाजानुसार भारतीय संघ ही स्पर्धा जिंकणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. आज ज्या मैदानावर अंतिम सामना खेळवला जात आहे. त्याच मैदानावर तिचे आजवरचे सर्व सामने खेळले गेले आहेत आणि त्यात ती विजयी ठरली आहे. याच मैदानावर टीम इंडियाकडून ग्रुप मॅचमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करण्यात आला होता.
हेही वाचा : IND vs NZ Final Match Toss Update : रोहितने गमावला टॉस, नाणेफेक जिंकून मिचेल सँटनरने घेतला फलंदाजीचा निर्णय
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ विजेतेपद मिळवण्याचाय इराद्याने मैदानात उरला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून आणखी एक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि मॅट हेन्री/नाथन स्मिथ.