कॅप्टन रोहित शर्माच्या दमदार खेळीने केला इंग्लिश खेळाडूंचा पराभव. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
रोहित हा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डावांमध्ये ३२ शतके करणारा दुसरा खेळाडू आहे. रोहितने २५९ एकदिवसीय डावांमध्ये हा आकडा गाठला. सचिनने २८३ डावांमध्ये ३२ एकदिवसीय शतके केली होती.
३७ वर्षीय रोहित सलामीवीर फलंदाज म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे . त्याने आतापर्यंत १५,३५० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने सचिनला मागे टाकले, ज्याने एकदिवसीय सलामीवीर म्हणून १५३३५ धावा केल्या होत्या.
३० वर्षांच्या वयानंतर भारतासाठी सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत रोहितने सचिनला मागे टाकले आहे. त्याने ३६ शतके ठोकली आहेत. सिचनने वयाच्या 30 व्या वर्षानंतर 35 शतके ठोकली.
रोहित एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा खेळाडू बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडला. गेलने आतापर्यंत ३३८ षटकार मारले आहेत. गेलने त्याच्या कारकिर्दीत ३३१ षटकार मारले.
रोहित शर्मासोबत शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. १७ व्या षटकात गिलला जेमी ओव्हरटनने बोल्ड केले. गिलने ५२ चेंडूत ६० धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ९ चौकार आणि १ षटकार मारला.