मुंबई इंडियन्सच्या जर्सीत धोनीचा फोटो Viral (Photo Credit- X)
MS Dhoni: सन २०२० मध्ये एमएस धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तेव्हापासून दरवर्षी तो आयपीएलमधूनही निवृत्त होणार अशा चर्चा होत असतात. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून धोनीने हे सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्जला (CSK) सलग पाच विजेतेपदे मिळवून दिली असली तरी, त्याच्या निवृत्तीचा सस्पेन्स कायम आहे. धोनी २०२६ च्या हंगामासाठी उपलब्ध असेल की नाही, याबाबत त्याने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर एका फोटोमुळे मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामध्ये एमएस धोनी मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करून दिसत आहे.
धोनी आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर केवळ आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळतो. आयपीएल संपल्यानंतर तो गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी विश्रांती घेतो आणि पुढील हंगामासाठी एक महिना आधी चेन्नईला परततो. याच पार्श्वभूमीवर, नुकताच कॅज्युअल फुटबॉल सामना खेळताना धोनी MI चा लोगो असलेली जर्सी घातलेला दिसला. या एका फोटोमुळे धोनीचे चाहते आणि क्रिकेट पंडितांना असा अंदाज लावला आहे की, तो पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो!
MS Dhoni in a Mumbai Indians jersey? 👀 📸: Arjun Vaidya | Instagram#MSDhoni #MumbaiIndians pic.twitter.com/U4pmcmDIPF — Circle of Cricket (@circleofcricket) October 7, 2025
धोनीचा हा फोटो व्हायरल होताच चाहत्यांमध्ये लगेच दोन गट पडले. काही चाहत्यांनी या फोटोचा आधार घेत थेट मुंबई इंडियन्सकडे मागणी केली की, “तुम्ही धोनीला घ्या आणि रोहित शर्माला परत चेन्नई सुपर किंग्जला द्या!” तर काही चाहते धोनीवर नाराज झाले. एका युजरने नाराजी व्यक्त करत लिहिले की, “हा माणूस पैशांसाठी केवळ त्याची जर्सीच नव्हे, तर त्याचे नागरिकत्व देखील बदलू शकतो.”
This man can even change his nationality for money jersey kya cheez haI — Jay (@Indianslumdog) October 7, 2025
धोनीने गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यानंतर आपल्या निवृत्तीच्या प्रश्नावर उत्तर दिले होते, “मला निर्णय घेण्यासाठी चार ते पाच महिने आहेत; काय करावे हे ठरवण्याची घाई नाही.” सध्या तरी धोनीच्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स कायम असून, मुंबई इंडियन्सच्या जर्सीतील या फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे हे निश्चित.
Mumbai Indians ने घेतला मोठा निर्णय; संघाच्या प्रशिक्षकपदी ‘या’ दिग्गजाची नियुक्ती