Mumbai Indians ने घेतला मोठा निर्णय (Photo Credit- X)
वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये (WPL) मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने आपल्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या लिसा नाईटली (Lisa Keightley) यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून, त्या चार्लोट एडवर्ड्स यांची जागा घेतील. लिसा यांनी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघासाठी दोन वेळा (१९९७ आणि २००५) वनडे विश्वचषक जिंकला आहे. त्या महिला क्रिकेटमधील सर्वात सन्मानित प्रशिक्षकांपैकी एक असून, त्यांच्याकडे असलेला प्रचंड अनुभव मुंबई इंडियन्स संघासाठी उपयुक्त ठरू शकतो.
मुंबई इंडियन्ससोबत जोडले जाणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे लिसा नाईटली यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, “या संघाने WPL मध्ये नवीन मापदंड प्रस्थापित केले आहेत. या प्रतिभावान खेळाडूंच्या समूहासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, जेणेकरून आम्ही आमचे यश आणखी पुढे नेऊ शकू आणि मैदानात तसेच मैदानाबाहेरही प्रेरणा देत राहू.”
ऐका ऐका! Our new #WPL Head Coach Lisa has a message for you 💌🗣️#AaliRe #MumbaiIndians pic.twitter.com/UJba05ROLJ — Mumbai Indians (@mipaltan) September 25, 2025
लिसा नाईटली इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षक बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्यांना डब्ल्यूबीबीएल (WBBL), द हंड्रेड (The Hundred) आणि डब्ल्यूपीएल फ्रेंचायझी कोचिंगचा मोठा अनुभव आहे. त्यांनीच गेल्या महिन्यात द हंड्रेडमध्ये नॉर्दर्न सुपरचार्जर्सच्या महिला संघाला विजेतेपद मिळवून दिले. आपल्या खेळाडूच्या कारकिर्दीत त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी ९ कसोटी, ८२ वनडे आणि एक टी-२० सामना खेळला आहे.
मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी लिसा नाईटली यांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, “मुंबई इंडियन्स परिवारात लिसा नाईटली यांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. महिला क्रिकेटमध्ये लिसा यांनी आपल्या खेळाबद्दलच्या आवडीने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. त्यांचे आगमन मुंबई इंडियन्ससाठी एका रोमांचक नव्या अध्यायाची सुरुवात करते.”
वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ आहे. WPL चे आतापर्यंत एकूण तीन सीझन झाले असून, त्यापैकी दोन वेळा मुंबई इंडियन्सच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी २०२३ आणि २०२५ मध्ये हे विजेतेपद जिंकले.