
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2026 टी20 विश्वचषक सुरू व्हायला फक्त 9 दिवस शिल्लक आहेत. २०२६ टी२० विश्वचषकची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. जगभरातील एकूण 20 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तथापि, T20 World Cup 2026 च्या आधी, USA क्रिकेट संघात खळबळ उडाली आहे. ICC ने संघाच्या स्टार खेळाडूला सर्व फॉरमॅटमधून निलंबित केले आहे. २८ जानेवारी रोजी, क्रिकेट वेस्ट इंडिज आणि आयसीसीने एक प्रेस रिलीज जारी करून अमेरिकन स्टार खेळाडू आरोन जोन्सला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्पुरते निलंबित केले.
क्रिकेट वेस्ट इंडिज आणि आयसीसीने जोन्सवर त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांचे पाच उल्लंघन केल्याचे आरोप लावले आहेत. हे आरोप २०२३-२४ हंगामात बार्बाडोसमध्ये झालेल्या बीआयएम१० स्पर्धेदरम्यान घडलेल्या कथित घटनांशी संबंधित आहेत. बीआयएम१० स्पर्धेतील सामन्यांचे काही पैलू फिक्सिंग किंवा फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जोन्सवर आहे. तो तपासात सहकार्य करण्यातही अयशस्वी ठरला आहे. २८ जानेवारी २०२६ पासून १४ दिवसांच्या आत जोन्सला आरोपांना उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
अमेरिका २०२६ च्या टी-२० विश्वचषकात ७ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध आपला मोर्चा सुरू करेल. त्यानंतर त्यांचा दुसरा सामना १० फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल. अमेरिका त्यांचा तिसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळेल, तर चौथ्या सामन्यात त्यांचा सामना नामिबियाशी होईल.
३१ वर्षीय जोन्सने अमेरिकेसाठी ५२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३३.९५ च्या सरासरीने १,६६४ धावा केल्या आहेत. त्याने ४८ टी-२० सामन्यांमध्ये २४.०६ च्या सरासरीने ७७० धावा केल्या आहेत. त्याच्याकडे एकदिवसीय सामन्यांमध्ये एक शतक आणि ११ अर्धशतके आहेत, तर टी-२० सामन्यांमध्ये त्याचे दोन अर्धशतके आहेत.
USA batter Aaron Jones has been charged by the ICC with five breaches of the Anti-Corruption Code and suspended from playing all cricket with immediate effect More details: https://t.co/2cHsoUyFlV pic.twitter.com/kz4qmctP1i — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 28, 2026
आयसीसीच्या म्हणण्यानुसार, “जोन्सला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे आणि २८ जानेवारी २०२६ पासून त्याच्याकडे आरोपांना उत्तर देण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी असेल.” न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या ३१ वर्षीय खेळाडूने अमेरिकेसाठी ५२ एकदिवसीय आणि ४८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने शेवटचे एप्रिल २०२५ मध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या प्रकरणामुळे आता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि तो दिलेल्या वेळेत आरोपांना उत्तर देण्याची तयारी करत आहे.