
Aaryavir Sehwag Became Captain of Delh
डीडीसीएच्या ज्युनियर पुरुष निवड समितीच्या बैठकीनंतर, आर्यवीर सेहवागच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंचाही समावेश असून, रन्नव बुग्गा उपकर्णधार आहे. ही स्पर्धा ८ ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे खेळवली जाईल. आता सर्वांचे लक्ष आर्यवीर सेहवागवर असेल.
आर्यवीरने ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली असली तरी, त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. मालिकेदरम्यान तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. वीरेंद्र सेहवागच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने २८ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने ४७ धावा केल्या मात्र, त्याचे अर्धशतक हुकले. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने ३४ धावांचे योगदान दिले.
आर्यवीरला वरिष्ठ क्रिकेट खेळण्याचाही अनुभव आहे. त्याने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वेस्ट दिल्ली लायन्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्याला फक्त दोनच सामने खेळायला मिळाले आणि दोन्ही सामन्यांमध्ये मिळून २४ धावा केल्या, परंतु, त्याला वरिष्ठ खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली. आर्यवीरने अलीकडेच सांगितले की त्याला क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करायची आहे. वीरेंद्र सेहवागचा मुलगा असल्याचा दबाव त्याला जाणवत नाही. तो आपला नेहमीचा खेळ खेळतो.
आर्यवीर सेहवाग (कर्णधार), तन्मय चौधरी, अर्णव बुग्गा (उपकर्णधार), धन्या नाकरा, उदय चावला, गर्व कुमार, अभिराज गगन सिंग (विकेटकीपर), तरुण सिंग (विकेटकीपर), आर्यन शर्मा, ओजसदीप सिंग, किरीट कौशिक, वरुण वंजानी,रुद्र देव यादव, प्रद्युम्न सानन, पार्थ राज, शांतनु यादव.