Rest of India defeated Kashmir in irani cup 2026
ईराणी कप २०२६ (Irani Cup 2026) च्या सामन्यात रेस्ट ऑफ इंडिया क्रिकेट संघाचा सामना जम्मू आणि काश्मीर संघाशी झाला. या सामन्यात जम्मू आणि काश्मीरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रेस्ट ऑफ इंडियाने पहिल्या डावात ६८ षटकांत २३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. त्यानंतर, ऋषभ पंतच्या संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत ३१९ धावा केल्या. तर, जम्मू आणि काश्मीरचा संघ दुसऱ्या डावात १११ धावांवर गारद झाला. रेस्ट ऑफ इंडियाने हा सामना १६७ धावांनी जिंकला.
पहिल्या डावात, रेस्ट ऑफ इंडियाच्या (Rest of India) संपूर्ण संघाने २३७ धावा केल्या. सलामीवीर शिखर मोहनने ६० धावा केल्या. स्मरण रविचंद्रननेही ६८ धावा केल्या. सरफराज खाननेही महत्त्वपूर्ण ४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, जम्मू आणि काश्मीरने २७८ धावा केल्या. कर्णधार पारस डोग्राने सर्वाधिक ७५ धावा केल्या. अब्दुल समदनेही ५७ धावा करून त्याला उत्तम साथ दिली.याशिवाय, गोलंदाज नासिर मुजफ्फरनेही ६४ धावा केल्या.
दुसऱ्या डावात रेस्ट ऑफ इंडियाने ३१९ धावा केल्या. सलामीवीर सनत संगवानने ५५ धावा केल्या. स्मरण रविचंद्रननेही १५३ चेंडूंमध्ये १३५ धावांची खेळी करून पंतच्या संघाला सामन्यात मोठी आघाडी मिळवून दिली. चौथ्या डावात २०० धावांचा टप्पा ओलांडणे सोपे नव्हते. परंतु स्मरण रविचंद्रनने शानदार शतक ठोकून एकहाती सामन्याचे चित्र पालटले आणि जम्मू आणि काश्मीर संघावर दबाव आणला.
दुसऱ्या डावात जम्मू आणि काश्मीरने चांगली सुरुवात केली. ५४ धावांवर त्यांची पहिली विकेट पडली. मात्र, दोन सलामीवीर वगळता कोणीही जास्त वेळ मैदानावर टिकू शकले नाही, परिणामी संघ २८.४ षटकांत केवळ १११ धावांवर सर्वबाद झाला. कामरान इक्बालने ३२, तर शुभम खजुरियाने ३६ धावा केल्या. अब्दुल समदनेही २० धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही.
गोलंदाजीमध्ये, मुकेश कुमारने ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघासाठी सहा महत्त्वपूर्ण विकेट्स घेतले. त्याने पहिल्या डावात दोन विकेट्स घेतले, तर मुकेश चौधरीनेही एक विकेट घेतला. मुकेशने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतले. स्टार वेगवान गोलंदाज आकाशदीपने दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी तीन विकेट्स घेत ऋषभ पंतच्या संघाला हा सामना सहज जिंकण्यास मदत केली.






