फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
अभिषेक नायर : भारताच्या क्रिकेट संघाच्या सपोर्टींग स्टाफमध्ये जेव्हा टीम इंडिया इंग्लड दौऱ्यावर असेल तेव्हा बदल पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर भारताच्या टीममध्ये देखील बदल पाहायला मिळू शकतात. काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की, भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर नायर हे आता कोलकाता नाईट राइडर्सचे प्रशिक्षक आहेत हे दिसून येत आहे. सध्या आयपीएलमध्ये केकेआरच्या डगआऊटमध्ये असतात. आता त्यांच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकपदावरून काढून टाकल्यानंतर, अनुभवी अष्टपैलू अभिषेक नायर आता एक नवीन जबाबदारी स्वीकारताना दिसत आहेत. टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्या सीझनमध्ये नायर मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स या नवीन संघाचे मार्गदर्शक असणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. अभिषेक नायरसाठी हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले राहिले आहे. त्याने भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेत गौतम गंभीरसोबत काम केले. यानंतर, भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये १-३ असा पराभव स्वीकारावा लागला.
#breaking Former India assistant coach Abhishek Nayar, currently assistant coach of Kolkata Knight Riders, will be appointed as the mentor of Mumbai South Central Maratha Royals in upcoming T20 Mumbai League Season-3..expect a formal announcement next week @MumbaiCricAssoc
— Gaurav Gupta (@toi_gauravG) April 26, 2025
या पराभवानंतर बीसीसीआयने काही मोठे निर्णय घेतले, ज्यामध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप, स्ट्रेंथ कोच सोहम देसाई आणि अभिषेक नायर यांनाही त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार गौरव गुप्ता यांनी दिलेल्या वृत्तानुसार, टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामात सामील होणाऱ्या दोन नवीन संघांपैकी एक असलेल्या मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सच्या मार्गदर्शकपदी अभिषेक नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित असली तरी, त्याबाबत चर्चा आधीच सुरू झाली आहे. नायरचा शांत स्वभाव आणि स्थानिक आणि आयपीएलमधील त्याचा दीर्घ अनुभव त्याला त्याच्या पदार्पणाच्या सीझनमध्ये चांगली कामगिरी करण्यास मदत करेल अशी संघाला आशा आहे.
अभिषेक नायरला आणखी एक आनंदाची बातमी, आता KKR नंतर या संघाची सांभाळणार जबाबदारी
पारस म्हांब्रे एआरसीएस अंधेरीमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू नायर हे एकमेव असे नाही जे बातम्यांमध्ये येतात. भारताचे माजी वेगवान गोलंदाज आणि माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनीही नवीन भूमिका स्वीकारली आहे. त्याने मुंबई टी-२० स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आणखी एका संघ एआरसीएस अंधेरीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून करार केला आहे. सध्या मुंबई इंडियन्सच्या कोचिंग सेट-अपचा भाग असलेला म्हाम्ब्रे त्याच्यासोबत भरपूर अनुभव आणि साधेपणाचा दृष्टिकोन घेऊन येतो जो एआरसीएसला जेतेपदासाठी गंभीर दावेदार बनवू शकतो.