फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
मोहम्मद शामी : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी मागील बरेच महिने दुखापतींशी झुंज देत होता. त्यामुळे तो बराच वेळ क्रिकेटपासून दूर होता, आयपीएल २०२४ मध्ये देखील आयपीएलचा भाग नव्हता. आता काही महिन्यापूर्वी झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याने भारतीय संघामध्ये पुनरागमन केले होते. त्याने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली. आता सध्या आयपीएल २०२५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद कडून खेळत आहे. पण तो आयपीएल २०२५ मध्ये सध्या चांगली कामगिरी करू शकला नाही.
२०२५ च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा काळ चांगला चालला नाही. पण शुक्रवारी चेन्नईविरुद्ध एसआरएचचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने काहीतरी खास केले. त्याने पहिल्याच चेंडूवर सीएसकेचा सलामीवीर शेख रशीदला खाते न उघडता बाद केले. विशेष म्हणजे शमीने हे पहिल्यांदाच केले नाही. याआधीही त्याने आयपीएलच्या तीन हंगामात असाच पराक्रम केला आहे. मोहम्मद शमीच्या बळींमध्ये दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. पहिल्याच चेंडूवर शमीने किती वेळा सलामीवीरांना आपला शिकार बनवले आहे ते पाहूया…
Aate hi kaam shuru kar diye! 🔥#MohammadShami strikes on the very first ball of the innings to give #SRH the perfect start in their quest for a maiden win at Chepauk! 💥
Can they make history tonight?👇✍🏻
Watch the LIVE action ➡ https://t.co/uCvJbWdEiC#IPLonJioStar 👉… pic.twitter.com/lLI5Ox5zXv
— Star Sports (@StarSportsIndia) April 25, 2025
२०१४ मध्ये शमीने जॅक कॅलिसला आपला बळी बनवले होते. आयपीएलचा हा हंगाम २०१४ मध्ये खेळला गेला आणि कॅलिस केकेआरकडून ओपनिंग करण्यासाठी आला. त्याचा झेल रॉस टेलरने घेतला. यानंतर, २०२२ मध्ये, शमीने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुलला बाद केले. राहुलचा झेल मॅथ्यू वेडने घेतला. २०२३ मध्ये, मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टला बाद केले, ज्याचा कॅच डेव्हिड मिलरने घेतला. आता या वर्षी मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर बळी पडणाऱ्यांच्या यादीत शेख रशीदचे नाव जोडले गेले आहे.
मोहम्मद शमीचा रेकॉर्ड खूप खास आहे. या बाबतीत त्याने लसिथ मलिंगा, ट्रेंट बोल्ट आणि डर्क नॅन्स सारख्या गोलंदाजांनाही मागे टाकले आहे. या तिन्ही गोलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर दोनदा फलंदाजांना आपले बळी बनवले आहेत. जर आपण पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या गोलंदाजांबद्दल बोललो तर त्यात मार्लन सॅम्युअल्स, केविन पीटरसन, दीपक चहर, लियाम लिव्हिंगस्टोन, इरफान पठाण, लक्ष्मीपती बालाजी, जोफ्रा आर्चर, जगदीशा सुचित, जयदेव उनाडकट, इशांत शर्मा, चामिंडा वास, ब्रेट ली, अल्फोन्सो थॉमस, अशोक दिंडा, सोहेल तन्वीर, पॅट कमिन्स, प्रवीण कुमार आणि तुषार देशपांडे यांची नावे आहेत.
हैदराबादच्या आयपीएल २०२५ च्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर संघ आता आठव्या स्थानावर आहे. संघाने फक्त आतापर्यत ३ सामने जिंकले आहेत.