फोटो सौजन्य - JioHotstar
अभिषेक शर्मा – दिग्वेश राठी यांच्यात वाद : सध्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यात पहिल्या डावांमध्ये लखनऊच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. पहिले फलंदाजी करत लखनऊच्या संघाने हैदराबाद समोर 206 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. सध्या हैदराबादची फलंदाजी सुरू आहे यामध्ये हैदराबादचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने दमदार सुरुवात केली आणि अर्धशतक झळकावले. आता या सामन्यातील आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी या दोघांचा भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हे प्रकरण नक्की का या संदर्भात आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अभिषेक शर्मा फलंदाजी करत होता आणि आठव्या वर मध्ये दिग्वेश राठी हा ओव्हर टाकत होता. यावेळी दिग्वेष राठी याने ७.३ ओव्हरमध्ये अभिषेक शर्माला बाद केले आणि त्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाला.
Tensions flared as Abhishek Sharma clashed with Digvesh Rathi, who celebrated his wicket with the infamous notebook gesture. The southpaw clearly didn’t appreciate it! 🔥#IPL2025 #LSGvsSRH | 📸 : JioStar pic.twitter.com/fAc7nGNR5u
— OneCricket (@OneCricketApp) May 19, 2025
दिग्वेश राठी याच्या सेलिब्रेशनमुळे त्याला बऱ्याचदा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यानंतर त्याने त्याची स्टाईल चेंज केली होती आणि तो जमिनीवर सहीच सेलिब्रेशन करायचा. आज अभिषेक शर्माची जेव्हा ओव्हरमध्ये आठव्या ओव्हरमध्ये विकेट घेतली. तेव्हा त्याने त्याचे जुने सेलिब्रेशन म्हणजेच हातावर सही करून त्याने सेलिब्रेशन केले. याचा राग अभिषेक शर्माला आला आणि तो दिग्वेश राठी याच्याकडे धावून आला आणि यावेळी दोघांना रोखण्यासाठी अंपायरला मध्यस्थी करावी लागली. सध्या या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
LSG vs SRH : मार्श आणि मारक्रम यांची शतकीय भागीदारी! लखनऊ सुपर जायंट्ससमोर 206 धावांचे लक्ष्य
अभिषेक शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आज दमदार कामगिरी केली आजच्या सामन्यात त्याने वीस चेंडूंमध्ये 59 धावा केल्या. यामध्ये त्याने सहा षटकार आणि चार चौकार ठोकले. आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा ने 295 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आणि चाहत्यांची मन जिंकली.