फोटो सौजन्य - IndianPremierLeague
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरू आहे. आयपीएलचा 61 वा सामना आहे, यामध्ये हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनऊच्या संघाने पहिले फलंदाजीचा आव्हान स्वीकारत हैदराबादसमोर 206 धावांचं लक्ष उभे केले आहे. आजचा सामना लखनऊसाठी फार महत्त्वाचा आहे. याआधी दोन्ही संघांची पहिल्या डावात कशी कामगिरी राहिली यावर एकदा नजर टाका.
लखनऊ सुपर जॉईंट्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर मिचेल मार्श याने आणि एडन मारक्रम या दोघांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी शतकीय भागीदारी केली. आजच्या सामन्यात मिचेल मार्श याने संघासाठी 39 चेंडूंमध्ये 65 धावा केल्या. यामध्ये त्याने चार षटकार आणि सहा चौकार मारले. ऋषभ पंत आणखी एकदा फेल ठरला आजच्या सामन्यात त्याने ऋषभ पंत याने सहा चेंडू खेळले आणि यामध्ये त्यांनी फक्त ७ धावा केल्या आणि ईशान मलिंगा यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
Innings Break!#LSG put up 2⃣0⃣5⃣ in a must-win game courtesy of fifties from their openers! 👊
Will #SRH chase this down?
Updates ▶ https://t.co/GNnZh911Xr#TATAIPL | #LSGvSRH | @LucknowIPL pic.twitter.com/2m9ASxUBvW
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2025
एडन मारक्रम याने आणखी एकदा अर्धशतक ठोकले, त्याने आजच्या सामन्यात 38 चेंडुमध्ये 61 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. मागील सामन्यातील हिरो आयुष बडोनी आजच्या सामन्यात काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने आजच्या सामन्यात पाच चेंडू खेळला आणि तीन धावा करून ईशान मलिंगा याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. अब्दुल समद हा देखील आजच्या सामनात फेल ठरला तर निकलस पुरण याने आज कमालीची फलंदाजी केली आणि त्याच्या बॅटने त्याने 45 महत्त्वाच्या धावा केला. शार्दुल ठाकूर फलंदाजीसाठी आला होता त्याने एक चौकार मारला आणि विकेट गमावली.
रोहित शर्माने ड्रीम 11 जिंकणाऱ्या खेळाडूला दिली Lamborghini! विचारला मजेशीर प्रश्न
सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजी बद्दल सांगायचं झालं तर ईशान मलिंगा याने आजच्या सामन्यात दोन विकेट्स घेतले तर नितेश कुमार रेड्डीच्या हाती एक विकेट लागला. फर्स्ट बेने आणि हर्षल पटेलने प्रत्येक संघाला एक क्रिकेट मिळवून दिला. आजच्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर अभिषेक शर्माच्या फलंदाजीवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे त्याचबरोबर ईशान किशन संघासाठी कशी फलंदाजी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.