RCB gets a new owner? Adar Poonawalla's name appears; 'That' post on X has created a stir
RCB got a new owner?: भारतीय क्रीडा जगतात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. तशी चर्चा आता होऊ लागली आहे. आरसीबीचे नवे मालक म्हणून अदर पूनावालाचे नाव समोर आले आहे. त्याचे कारण ठरले ते म्हणजे अदर पूनावाला यांचे एक ट्विट. त्यांनी आरसीबीमध्ये हिस्सा खरेदी करण्याची शक्यता दर्शविली आहे. बुधवारी, पूनावाला यांनी आरसीबीचे मालक, डियाजिओ-नियंत्रित युनायटेड स्पिरिट्स यांच्या मालकीच्या फ्रँचायझीमध्ये हिस्सा खरेदी करण्यास इच्छा व्यक्त केली आहे.
आरसीबी संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पंजाबला पराभूत करत २०२५ च्या १८ व्या हंगामाचे जेतेपद जिंकले आहे. आरसीबीचे हे पहिलेच जेतेपद ठरले आहे. आता अशातच आरसीबीला नवा मालक मिळण्याची चर्चा समोर आली आहे. अदर पूनावाला नवे मालक असणार असे बोलले जाऊ लागले. अदर पूनावाला यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या एक्सवर लिहिले की, “योग्य मूल्यांकनानुसार, @RCBTweets हा एक उत्तम संघ आहे…”, त्यांच्या या ट्विटवरुन चांगलीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा : IND vs WI: कुलदीप यादवचा किलर बॉल आणि शाई होप त्रिफळाचित! Video होतोय तूफान व्हायरल
आरसीबी आयपीएल विजयाचा आनंद साजरा करत असताना ४ जून रोजी, बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. यावेळी आरसीबीच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सुमारे ३००,००० लोकांचा मोठा जमाव जमला होता आणि यावेळी ही घटना घळी. या दुःखद घटनेनंतर, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून आरसीबीला जबाबदार धरण्यात आले होते. ज्यामुळे फ्रँचायझीच्या विक्रीबाबत मोठी अडचण निर्माण झाली.
पूनावाला यांचे ट्विट का?
आयपीएलचे पहिले कमिशनर राहिलेले ललित मोदी यांनी मंगळवारी आगीत तेल ओतले. त्यानंतर अदर पूनावाला यांचे हे ट्विट आले. त्यांनी म्हटले आहे की, यावेळी आरसीबी खरेदी करण्यापेक्षा दुसरी चांगली गुंतवणूक असू शकत नाही. ललित मोदी यांना ठाम विश्वास आहे की महत्त्वपूर्ण जागतिक निधी किंवा सार्वभौम निधी त्यांच्या गुंतवणूक धोरणाचा आणि भारताच्या धोरणाचा भाग म्हणून त्यांचा समावेश करू इच्छितात.
हेही वाचा : IND vs WI 1st Test : Jasprit Bumrah ने कसोटी क्रिकेटमध्ये डंका! दिग्गज कपिल देवचा ‘हा’ विक्रम केला उद्ध्वस्त