Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?

Afghanistan Qualified for ODI World Cup 2027: अफगाणिस्ताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंड पराभव केला. या विजयासह त्यांनी २०२७ च्या विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 08, 2026 | 03:08 PM
क्रिकेट विश्वात अफगाण ‘वादळ’! ODI World Cup 2027 साठी थेट क्वालिफाय, ‘हा’ संघ पडला बाहेर?
Follow Us
Follow Us:
  • अफगाणिस्तानची वर्ल्ड कपमध्ये धडाकेबाज एन्ट्री
  • अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दमदार विजय
  • वेस्ट इंडिज शर्यतीतून बाहेर
आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ७ ऑगस्ट रोजी ब्रेडी क्रिकेट क्लब मैदानावर खेळला गेला. या सामन्यात, आयर्लंडसमोर ३०० दावांचे लक्ष्य होते. परंतु, त्यांचा संघ ३३.४ षटकांत २०७ धावांवर सर्वबाद झाला. अफगाण संघाने ९२ धावांनी विजय मिळवला. फिरकी गोलंदाज राशीद खानने ६ विकेट घेत अफगाणिस्तानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या विजयासह अफगाणिस्तान २०२७ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी अधिकृतपणे थेट पात्र ठरला आहे.

पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB ची मोठी कारवाई; स्टार खेळाडूवर घातली २ वर्षांची बंदी

अफगाणिस्तानने मिळवले २०२७ च्या वर्ल्डकपचे तिकिट

अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडला ९२ धावांनी पराभूत करून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या प्रभावी विजयासह, अफगाणिस्तानने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकातील आपले स्थान निश्चित केले आहे. आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. मात्र, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने दमदार विजय मिळवला. यामुळे आयर्लंडच्या थेट पात्रतेच्या उरलेल्या आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या आणि अफगाणिस्तानसाठी मार्ग मोकळा झाला. आगामी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवणारा अफगाणिस्तान हा नववा संघ आहे. अफगाणिस्तानने दुसऱ्यांदा अव्वल आठ संघांमध्ये स्थान मिळवून थेट एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. यापूर्वी, अफगाणिस्तानने २०२३ मध्ये ही कामगिरी केली होती. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी यापूर्वीच एकदिवसीय विश्वचषकात आपले स्थान निश्चित केले होते. यजमान देश म्हणून दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनाही आपोआप पात्रता मिळाली आहे.

अफगाणिस्तानचा आयर्लंडवर दमदार विजय

अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध २९९ धावांचे लक्ष्य सहजपणे राखले. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत अफगाणिस्तानेन ४७ षटकांमध्ये २९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ ४२.५ षटकांत २०७ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून राशीद खानने सहा विकेट घेतले. हा विजय अफगाणिस्तानसाठी खूप खास आहे, कारण या विजयामुळे त्यांना २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे तिकिट मिळाले आहे.

वेस्ट इंडिज शर्यतीतून बाहेर

दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा मार्ग दिवसेंदिवस कठीण झाला आहे. ते थेट पात्रता शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आता फक्त एकच जागा शिल्लक आहे, ज्यासाठी बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात स्पर्धा आहे. एकदिवसीय क्रमवारीत वेस्ट इंडिज १०व्या स्थानावर आहे. ३० सप्टेंबरच्या अंतिम तारखेपूर्वी संघाचे फक्त दोन एकदिवसीय सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने भारताविरुद्ध होणार आहेत. त्यामुळे, वेस्ट इंडिजसाठी थेट विश्वचषक स्थान मिळवणे खूप कठीण आहे. दुसरीकडे, बांगलादेश थेट पात्र ठरू शकतो.

IND vs SL: क्रिकेट फॅन्सची बल्ले-बल्ले! भारत-श्रीलंका टेस्टसाठी स्टेडियममध्ये मिळणार फ्री एन्ट्री; श्रीलंका बोर्डाचा मोठा निर्णय

Web Title: Afghanistan qualified for 2027 odi world cup west indies out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • Ireland Cricket Team
  • ODI World Cup 2027
  • West Indies Cricket Team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.