Ranji Trophy 2024 Shreyas Iyer Did Wonders Set The Ranji Trophy on Fire with His Bat Hit a Stormy Century
IPL 2025 RCB नवीन कर्णधार : IPL 2025 लिलावाचा मोठा स्टेज तयार झाला आहे. 18 व्या हंगामाचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. यावेळचा लिलाव खूप खास आहे, कारण तीन वर्षांनी मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. या लिलावात अनेक सुपरस्टार खेळाडूही आहेत. यामुळे हा लिलाव आणखी खास होणार आहे. आरसीबी श्रेयस अय्यरवर मोठी बोली लावण्याची दाट शक्यता आहे. श्रेयस अय्यरलावर मोठी जबाबदारी येणार आहे.
या संघांचा समावेश
आयपीएल 2025 च्या लिलावातून अनेक संघांना त्यांचा कर्णधार सापडणार आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे. या सर्वांनी लिलावापूर्वी आपल्या कर्णधारांना सोडले आहे. IPL लिलावाच्या 72 तास आधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर
RCB श्रेयस अय्यरला विकत घेण्याच्या जोरदार तयारीत असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआर गेल्या मोसमात चॅम्पियन बनला होता. तथापि, आगामी हंगामासाठी फ्रँचायझी आणि अय्यर यांच्यात चर्चा झाली नाही आणि अशा परिस्थितीत केकेआरने अय्यरला सोडले. अहवालात असेही म्हटले आहे की, RCB व्यतिरिक्त, लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सदेखील अय्यरवर मोठी बोली लावण्यास तयार आहेत.
श्रेयस अय्यरला कर्णधार बनवू शकतात
गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार आरसीबी आणि दिल्ली, श्रेयस अय्यरला कर्णधार बनवू शकतात. ज्याप्रमाणे केकेआरने आपला कर्णधार अय्यरला सोडले, त्याचप्रमाणे दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबीने त्यांचे कर्णधार ऋषभ पंत आणि फाफ डू प्लेसिस यांना सोडले आहे. आरसीबी अय्यरसाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे.
तीन खेळाडूंना कायम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 साठी फक्त तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे, ज्यासाठी त्यांनी एकूण 37 कोटी रुपये खर्च केले आहेत. आरसीबीने विराट कोहली (21 कोटी), रजत पाटीदार (11 कोटी) आणि यश दयाल (5 कोटी) यांना कायम ठेवले आहे. अशीही बातमी आहे की, आरसीबी प्रथम विराटला कर्णधार बनवण्याच्या विचारात आहे. मात्र, त्याला पुन्हा कर्णधार व्हायचे की नाही हे किंग कोहलीवर अवलंबून आहे. कोहलीने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिल्यास फ्रँचायझी नवीन कर्णधाराची नियुक्ती करेल.