Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : हा नाही सुधारणार, शाहिद आफ्रिदीने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली! म्हणाला ‘कुजलेले अंडे…’

भारताच्या काही खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे WCL यांनी हा सामना अधिकृतपणे रद्द करून सोशल मीडिया संदर्भात घोषणा केली होती. आफ्रिदीने आपला राग तीव्रपणे व्यक्त केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 21, 2025 | 03:43 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स लीग सुरू झाले आहे. यामध्ये पहिले दोन सामने चांगल्या प्रकारे पार पडले. पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडला पराभूत केले होते तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा वेस्टइंडीज विरुद्ध सामना अनिर्णित राहिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २० जुलै रोजी सामना खेळवला जाणार होता. एडबस्टन येथे खेळण्यात आलेला सामना हा रद्द करावा लागला. भारताच्या काही खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स यांनी हा सामना अधिकृतपणे रद्द करून सोशल मीडिया संदर्भात घोषणा केली होती. 

आता पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदी याने भारतीय खेळाडूंच्या या निर्णयावर  खिल्ली उडवली आहे. सध्या त्याचे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. आफ्रिदीने आपला राग तीव्रपणे व्यक्त केला आहे आणि अप्रत्यक्षपणे शिखर धवनवर निशाणा साधला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की धवन हा भारतीय संघातील पहिला खेळाडू होता ज्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ उतरणार मैदानात, जाणून घ्या ताकद आणि कमजोरी

पत्रकार परिषदेत बोलताना आफ्रिदी म्हणाला, “खेळ देशांना जवळ आणतो. जर राजकारण प्रत्येक गोष्टीत आडवे आले तर तुम्ही पुढे कसे जाल? संवादाशिवाय गोष्टी सोडवता येत नाहीत. अशा कार्यक्रमांचा उद्देश एकमेकांना भेटणे हा देखील असतो. तथापि, तुम्हाला माहिती आहे की नेहमीच एक कुजलेला अंडा असतो जो सर्वकाही बिघडवतो. भारतीय संघाने सामन्याच्या एक दिवस आधी सराव केला होता. मला वाटते की टीम इंडियाने फक्त एका खेळाडूमुळे आपले नाव मागे घेतले. भारतीय संघ देखील खूप निराश आहे. ते येथे खेळण्यासाठी आले होते.”

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भारताला अनेक खरे खोटे सुनावले होते त्याचबरोबर पाकिस्तान निर्दोष आहे असे त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. हा वाद मोठ्या प्रमाणात चालला त्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटर्स देखील भारताच्या समर्थनात सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले होते. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये 25 हून अधिक पर्यटकांना त्यांचे जीव गमवावा लागला होता. पाकिस्तानमधील काही आतंकवादी येऊन त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडून ठार मारले. 

Shahid Afridi reacted to the cancellation of the clash between India Champions and Pakistan Champions, with his presence being one of the main reasons behind several Indian players refusing to play.#WCL2025 #WCL25 pic.twitter.com/F5P107b7do

— Circle of Cricket (@circleofcricket) July 21, 2025

भारताने त्याच्या प्रत्युत्तरात ऑपरेशन सिंदूर कडक शब्दात उत्तर दिले. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान मधील अनेक आतंकवादी अड्डे हे उडवण्यात आले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन ते तीन आठवडे तणावाचे वातावरण राहिले. एवढेच नव्हे तर भारतामध्ये अनेक पाकिस्तानी कलाकारांना देखील बॅन करण्यात आले.

Web Title: After the ind vs pak match was cancelled shahid afridi mocked the indian players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • cricket
  • IND VS PAK
  • Shahid Afridi
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!
1

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान
2

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान

‘आफ्रिदीने कुत्र्याचे मांस खाल्ले म्हणून भुंकतोय..’, पाकिस्तानी खेळाडूबद्दल इरफान पठाणचा सनसनाटी खुलासा
3

‘आफ्रिदीने कुत्र्याचे मांस खाल्ले म्हणून भुंकतोय..’, पाकिस्तानी खेळाडूबद्दल इरफान पठाणचा सनसनाटी खुलासा

भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी
4

भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.