Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy 2025 : न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात या खेळाडूंना मिळू शकतो आराम, केएल राहुलने दिली मोठी अपडेट

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि मोहम्मद शामी यांच्या दुखापतींबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने त्याच्या दुखापतीबाबत मोठे विधान केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 01, 2025 | 08:21 AM
फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया

फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अपराजित आहे, आता टीम इंडियाचा शेवटचा साखळी सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन २ मार्च रोजी करण्यात आले आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये बांग्लादेश आणि दुसऱ्या सामन्यात यजमान पाकिस्तान संघाला पराभूत केले आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि मोहम्मद शामी यांच्या दुखापतींबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलने त्याच्या दुखापतीबाबत मोठे विधान केले आहे.

IND vs NZ : कॅप्टन शर्मा बाहेर, रिषभ पंत करणार एंट्री? अर्शदीप चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये करणार पदार्पण, टीम इंडियाची Playing 11

केएल राहुलने दुखापतींबद्दलच्या चिंता फेटाळून लावल्या आणि रोहित शर्मा आणि मोहम्मद शामी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याची पुष्टी केली. त्याच वेळी, टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी तयारी करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला हरवून उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यानंतर, भारत २ मार्च २०२४ रोजी त्यांच्या शेवटच्या गट सामन्यात न्यूझीलंडचा सामना करणार आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीतून कर्णधार रोहित शर्मा आता बरा होत आहे, असे वृत्त आहे. दुखापत गंभीर नसली तरी, उपांत्य फेरीसाठी तो तंदुरुस्त राहावा यासाठी संघ व्यवस्थापन त्याला आगामी सामन्यासाठी विश्रांती देण्याचा विचार करत आहे. दरम्यान, मोहम्मद शामीच्या अलीकडील सराव सत्रांना अनुपस्थितीमुळे त्याच्या उपलब्धतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत दुखापतीच्या अफवांवर बोलताना, यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने चाहत्यांना धीर दिला, “फिटनेसच्या बाबतीत मला वाटते की सर्व काही ठीक आहे.” त्याने संघातील त्याच्या भूमिकेबद्दलही सांगितले. पुढे तो म्हणाला, “जेव्हा ऋषभसारखा प्रतिभा असलेला खेळाडू संघात असतो तेव्हा दबाव असतो. मी खोटे बोलणार नाही. पण मला एक जबाबदारी देण्यात आली आहे आणि मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न करत नाही.”

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही. शेवटच्या लीग सामन्यात त्याला मैदानात उतरवता येईल का? असे विचारले असता राहुल म्हणाले, ‘मी नेतृत्व गटाचा भाग नाही, पण मला खात्री आहे की त्यासाठी मोह येईल. खेळाडूंना आजमावण्याची संधी मिळाल्यावर मी याआधीही अशा परिस्थितीतून गेलो आहे, पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ते होईल की नाही हे मला माहित नाही.

न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा साखळी सामना झाल्यानंतर ४ मार्च रोजी पहिला सेमीफायनलचा सामना रंगणार आहे, तर दुसऱ्या सामन्याचे आयोजन ५मार्च रोजी करण्यात आले आहे. भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाने सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे.

Web Title: Ahead of the india vs new zealand match kl rahul has made a big statement regarding rohit sharmas injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 08:21 AM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • India Vs New Zealand
  • KL. Rahul

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : KL Rahul ने गाठला मोठा टप्पा! भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा केल्या पूर्ण 
1

IND vs SA 1st Test : KL Rahul ने गाठला मोठा टप्पा! भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा केल्या पूर्ण 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.