'Standing by the farmer's side...', Ajinkya Rahane gets emotional after seeing the condition of Bali Raja, which was washed away due to heavy rain; Watch the video
Ajinkya Rahane ahead for farmers : राज्यात पावसाने थैमान घातले असून मुळसधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्व फटका शेतकऱ्याला बसला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातीत पीक पावसाच्या पाण्याने पाहून गेले आहे. मराठवाड्याला पावसाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसात मराठवाड्यात पावसाने तर कहरच केला आहे. यावर्षी पावसामुळे मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात महापुराचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास उद्ध्वस्थ झाला आहे. कित्येकांची घरं मोडली आहे, कोसळली आहेत. सोबत जनावरे देखील वाहून गेली आहेत. त्यामुळे बळी राजा हवालदिल झाला आहे. अशातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. दरम्यान भारतीय स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे देखील समोर आला आहे. त्याने शेतकरी आपला कणा असून त्याच्यासाठी उभ राहण्याच आवाहन रहाणेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा : Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध जसप्रीत बुमराह दिसणार मैदानात? BCCI कडे स्वतः च केला खुलासा; वाचा सविस्तर
अजिंक्य रहाणेकडून त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की ‘शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. चला, कठीण काळात त्यांच्या सोबत उभे राहूया.’ त्यासोबतच अजिंक्य रहाणेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की “गेल्या अनेक दिवस महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये अतिपाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच बरंच नुकसान झालं आहे आणि होत आहे, याबद्दल तुम्ही वाचलं असेल आणि ऐकलं देखील असेल. मी स्वत: एका शेतकरी कुटुंबातील असल्याने मला जाणीव आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला किती त्रास होतो.”
अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला की, “वर्षानुवर्षे शेतकरी शेतात महेनत करत असतो. त्याच्या मेहनतीमुळे आपल्याला ताटात अन्न मिळतं. सरकार आपल्यापरिने मदत करतं आहे. परंतु, आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभं रहाणं. आपल्याला जी काही मदत करता येईल, ती नक्की करावी. मी माझ्या बाजूने मदत करतोच आहे, पण मला सर्वांना हेच सांगायचंय की शक्य असेल, ती मदत करा. कारण हीच वेळ असते, ज्यावेळी शेतकऱ्याला आपल्या सर्वांची गरज असते. शेतकरी हा आपला कणा आहे.”
अजिंक्य रहाणेबाबत सांगायचे झाले तर हा क्रिकेटपटू नेहमीच शेतकऱ्यांसाठी बोलत असतो, तसेच तो खूप वेळा आपल्या गावी जाऊन शेतात वेळ घालवत असल्याचे दिसत असतो.
हेही वाचा : अभिषेक शर्माची लागणार लॉटरी! ‘या’ संघाविरुद्ध करणार एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण! निवड समितीचा विचार पक्का?