जसप्रीत बूमराह(फोटो-सोशल मीडिया)
जसप्रीत बुमराह सध्या आशिया कपमध्ये भारतीय संघासोबत खेळत आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. तथापि, बुमराहचा आशिया कपमधील हंगाम चांगला गेला नाही. या स्पर्धेनंतर लगेचच वेस्ट इंडिजविरुद्ध एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. परिणामी, बुमराहच्या कामाच्या ताणाबद्दल चर्चा रंगली आहे. बुमराहच्या दुखापतीमुळे, निवडकर्त्यांनी त्याला विश्रांती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
३१ वर्षीय या गोलंदाज जसप्रीत बुमराहची टी-२० आशिया कपसाठी निवड होईल की नाही याबद्दलही अटकळ बांधण्यात येत होती. अखेर बुमराहचा संघात समावेश करण्यात आला आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, भारत २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात धडक मारेल का? त्यानंतर, भारतीय खेळाडूंकडे कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी फक्त तीन दिवसच असणार आहेत. मालिकेचा पहिला सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक असलेले रायन टेन डोइशेट यांनी मंगळवारी बांगलादेशविरुद्धच्या आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात बुमराहला विश्रांती देण्याबाबतची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांनी म्हटले आहे की, बुमराहला विश्रांती देण्याची शक्यता खूपच कमी आहे. तसेच तो वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळण्यास देखील तयार आहे. पुढे काही महत्वाचे सामने खेळत राहणे आणि सामन्यात घालवणे त्याच्यासाठी अधिक चांगले असणार आहे.
हेही वाचा : IND vs BAN : मुस्तफिजूर रहमानला खुणावतोय ‘हा’ विक्रम! भारताविरुद्धच्या सामन्यात रचणार इतिहास
उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने भारताच्या चारपैकी तीन सामने खेळले आहेत. भारताने पुढील फेरीसाठी आधीच पात्रता मिळवल्यानंतर त्याला आणि वरुण चक्रवर्तीला ओमानविरुद्धच्या गट अ च्या औपचारिक सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती.
डोइशेट यांनी पुढे म्हणाले की, “गुरुवारपासून एक कसोटी सामना सुरू होणार असून आपल्याला हे लक्षात ठेवावे लागणार आहे. म्हणून, हे खूप चांगले सराव आणि वर्कलोड व्यवस्थापन असणार आहे.”






