अभिषेक शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Abhishek Sharma : सध्या आशिया कप २०२५ (Asia cup 2025) स्पर्धेचा थरार सुरू असून आता सुरप ४ सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत गट टप्प्यातील ३ आणि एक सुपर ४ सामना असे मिळून चार सामने जिंकले आहेत. भारताच्या या विजयात अभिषेक शर्माच्या फलंदाजीने देखील मोलाची भूमिका बजावली आहे. त्याच्या या कामगिरीचा मोबदला म्हणून त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आम्ही अस का म्हणत आहोत याबद्दल जाणून घेऊया.
भारताचा उदयोन्मुख भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या आशिया कपमध्ये आपल्या फलंदाजीने विरोधी संघाच्या गोलंदाजांना घाम फोडत आहे. त्यामुळे आता निवडकर्त्यांचे सर्व लक्ष अभिषेक शर्मावर लागून राहिले आहे. एकदिवसीय संघात सध्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारताकडून डावाची सुरुवात करतात.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतीय निवडकर्त्यांनी अभिषेक शर्माच्या आशिया कपमधील कामगिरीच्या आधारे त्याला एकदिवसीय संघात स्थान देण्याचा विचार करण्यात येत आहेत. या अहवालात म्हटले आहे की, अभिषेक शर्माच्या दबावाखाली चांगली कामगिरी करण्याच्या क्षमतेने निवडकर्ते चांगलेच प्रभावित झाल्याचे बोलले जात आहे. खासकरून २१ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना गिलसोबत केलेली भागीदारी खूपच वेधक होती.
अभिषेक शर्माने २०२४ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. अभिषेक शर्माने २१ सामन्यांमध्ये ३५.४० च्या सरासरीने आणि १९७.२१ च्या स्ट्राईक रेटने ७०८ धावा फटकावल्या आहेत. अभिषेक शर्मा सध्या आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे, त्याने चार डावांमध्ये २०८.४३ च्या स्ट्राईक रेटने १७३ धावा काढल्या आहेत.
अस म्हटले जात आहे की, अभिषेक शर्माची एकदिवसीय संघात निवड झाल्यास यशस्वी जयस्वालसाठी ही बाब अन्याय्यकारक असू शकते. घरगुती क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये अभिषेक शर्माचा रेकॉर्ड जयस्वालपेक्षा अधिक चांगला असून त्याने ६१ लिस्ट ए सामन्यांमध्ये २०१४ धावा फटकावल्या आहेत. यशस्वी जयस्वालने आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी तो अधिक पात्र असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय एकदिवसीय संघात अभिषेक शर्माची निवड होण्याची शक्यता तेव्हाच आहे जेव्हा भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी शुभमन गिलला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. गिल आणि अभिषेक शर्मा सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सलामीवीराची भूमिका बजावत आहेत. जर शुभमन गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली तर संघाकडे केएल राहुलचा एक उत्तम सलामीवीराचा पर्याय आहे. त्यामुळे, अभिषेक शर्माला संघात समाविष्ट केले तरी तो अंतिम इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकेल का? हे पाहणे रंजक असणार आहे.
हेही वाचा : Ashes 2025 मालिकेसाठी इंग्लंड संघ घोषित जाहीर! ‘या’ घातक गोलंदाजाचे पुनरागमन; वाचा कुणाची लागली वर्णी…