
अष्टपैलू व्यंकटेश अय्यर ७ कोटीत आरसीबीच्या संघात (Photo Credit- X)
व्यंकटेश अय्यर आरसीबीच्या संघात
लखनौ, गुजरात आणि बंगळुरूने टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरसाठी बोली लावली. अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला ₹७ कोटींना खरेदी केले.
India all-rounder Venkatesh Iyer is SOLD to @RCBTweets for INR 7 Cr#TATAIPLAuction — IndianPremierLeague (@IPL) December 16, 2025
LSG ने वानिंदू हसरंगा घेतले संघात
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याला लखनौ सुपर जायंट्सने विकत घेतले आहे. LSG ने हसरंगाला त्याच्या मूळ किमतीत ₹2 कोटी विकत घेतले. लखनौशिवाय इतर कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यासाठी बोली लावली नाही.
क्विंटन डी कॉक मुंबई इंडियन्सच्या संघात
मुंबई इंडियन्सने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकला ₹१ कोटी (अंदाजे $१० दशलक्ष) मध्ये विकत घेतले. एमआयने त्याला त्याच्या मूळ किमतीवर खरेदी केले.
कुठे पाहू शकता लिलाव?
तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव पाहू शकता. तुम्ही जिओहॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकता.