deepak chahar
चेन्नई : भारतीय गोलंदाज दीपक चहर गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे क्रिकेट खेळू शकलेला नाही. भारताचा फिरकीपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) शुक्रवारी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये दीपक चहरच्या तंदुरूस्तीबाबत अमित मिश्राने माहिती दिली आहे. दीपक चहरनं (Deepak Chahar) दुखापतीवर मात केली आहे. त्यामुळे तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी दीपक चहरचं तंदुरुस्त होणं, भारतीय संघासाठी चांगली गोष्ट ठरू शकते.
Good news for CSK’ fans.. ?
He is fit and very soon will be ready for team India and CSK. Wishing you all the very best @deepak_chahar9. ♥️? pic.twitter.com/GkL7uDh4dI
— Amit Mishra (@MishiAmit) July 29, 2022
दीपक चहरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेदरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. ज्यामुळं त्याला आयपीएल २०२२ मधून बाहेर पडावं लागलं होतं. आयपीएलच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरला १४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. दुखापतीमुळं त्याला चेन्नईच्या संघासाठी एकही सामना खेळता आला नव्हता.
[read_also content=”बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा, सुप्रिया सुळेंची राज्यपालांवर टिका https://www.navarashtra.com/maharashtra/supriya-sule-comment-on-governor-koshyaris-statement-nrps-309741/”]
अमित मिश्राच्या ट्विटर पोस्टनुसार, वेगवान गोलंदाजानं पुन्हा तंदुरुस्ती मिळवली असून लवकरच तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. प्रशिक्षण सत्रादरम्यानचा एक फोटो शेअर करत अमित मिश्रानं (Amit Mishra) लिहिले आहे की, “सीएसकेच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. तो तंदुरुस्त आहे आणि लवकरच टीम इंडिया आणि सीएसकेकडून खेळण्यासाठी सज्ज होईल. दीपक चहरला शुभेच्छा!”