Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gender Affirming Surgery नंतर संजय बांगरची मुलगी अनाया बांगर भावूक, वडिलांसह फोटो शेअर करत म्हणाली, ‘हा सोपा प्रवास नव्हता…’

अनाया बांगरने थायलंडमध्ये जेंडर अफर्मिंग शस्त्रक्रिया करून घेतली. शस्त्रक्रियेनंतर अनायाने तिच्या वडिलांसाठी क्रिकेटर संजय बांगरसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. सर्व भावना तिने या पोस्टमध्ये शेअर केल्या आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 21, 2026 | 10:51 PM
अनाया बांगर झाली भावूक (फोटो सौजन्य - Instagram)

अनाया बांगर झाली भावूक (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • अनाया बांगरची भावूक पोस्ट काय म्हणाली अनाया बांगर
  • झाली जेंडर अफर्मिंग सर्जरी 
  • वडिलांसाठी लिहिली पोस्ट 
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनायाचा जन्म मुलगा म्हणून झाला होता, पण तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अलीकडेच, अनायाने थायलंडमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. सध्या ती शस्त्रक्रियेनंतर बरी होत आहे. अनायाने हॉस्पिटलमधून एक फोटो आणि एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये तिचे वडील, संजय बांगर, देखील तिच्यासोबत आहेत. संजय बांगर यांनी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

अनाया बांगरची भावूक पोस्ट 

अनाया बांगरने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “हा प्रवास सोपा नव्हता… केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर माझ्या कुटुंबासाठीही. मला समजून घेण्यासाठी, माझा स्वीकार करण्यासाठी आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी त्यांना वेळ लागला. हे काही एका क्षणात घडले नाही. आमच्या सर्वांसाठीच तो गोंधळाचा, प्रश्नांचा आणि वैयक्तिक त्रासाचा काळ होता. पण आज, इथे उभे असताना, माझे मन केवळ कृतज्ञतेने भरून आले आहे.

माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या क्षणी माझे वडील माझ्या पाठीशी असणे, याचा अर्थ ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांचा पाठिंबा काही एका रात्रीत मिळाला नाही… पण जेव्हा तो मिळाला, तेव्हा तो अत्यंत खरा, नि:शर्त आणि भक्कम होता. ही शस्त्रक्रिया माझ्यासाठी एक मोठे पाऊल होते; पण ते माझ्यासोबत असल्यामुळेच, हे सर्व साध्य करणे मला शक्य वाटले. विकासासाठी वेळ लागतो. प्रेमासाठीही वेळ लागतो. पण जेव्हा ते गवसते, तेव्हा ते सर्वस्वापेक्षाही मौल्यवान ठरते. सदैव कृतज्ञ”

Anaya Bangar पुन्हा बनणार आर्यन? शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांनी संजय बांगरच्या मुलीने घेतला मोठा निर्णय; वाचा सविस्तर

आता तिला तिच्या वडिलांचाही पाठिंबा मिळत आहे

अनायाचा जन्म आर्यन बांगर म्हणून झाला होता. लिंगबदल केल्यानंतर तिने तिचे नावही बदलले. सुरुवातीला, अनायाला तिचे लिंग बदलण्यासाठी तिच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नाही. पण आता संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनाया बांगरने आपल्या या प्रक्रियेबाबत खुलेआम सांगितले. नक्की काय भावना असतात आणि कशा त्रासातून जावं लागतं याबाबतही तिने बिनधास्त जगासमोर आपले मत मांडले होते.
आपल्या आईवडिलांनाही याबाबत धक्का बसला होता आणि ते पहिल्यांदा हे स्वीकारायला तयार नव्हते असं तिने अनेक मुलाखतीमध्येही सांगितलं होतं. मात्र आता हळूहळू चित्र बदलत आहे आणि आपल्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे हेच तिने या पोस्टमधूनही सांगितलं आहे. गेल्या काही काळापासून तिला याचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासही झाला होता. मात्र आता आपले कुटुंब आपल्याबरोबर असल्यामुळे सर्व काही ठीक आहे असंच तिच्या पोस्टमधून दिसून येत आहे. 

भावाचा पाठिंबा

आर्यनला अर्थात अनायाला अजून एक भाऊ आहे आणि तिच्या भावाने या गोष्टीला नेहमीच स्वीकारले आणि पाठिंबा दिला होता. तो तिच्या व्हिडिओमधूनही अनेकदा सोशल मीडियावर दिसून येत होता. मात्र आई-वडिलांचा पाठिंबा मिळायला नक्कीच तिला वेळ लागला होता. अखेर तिच्या आई-वडिलांनी ही गोष्ट स्वीकारल्यानंतरचा आनंद तिच्या पोस्टमधूनही दिसून येत आहे. 

Anaya Bangar Video: ‘प्रसिद्ध क्रिकेटपटू मला अश्लील फोटो पाठवायचा’; अनाया बांगरचा धक्कादायक खुलासा!

Web Title: Anaya bangar shared emotional note for father sanjay bangar after gender affirming surgery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 10:51 PM

Topics:  

  • Anaya Bangar
  • cricket news
  • Sanjay Bangar

संबंधित बातम्या

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?
1

IND vs AFG T20I Series: क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर! भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिकेची तारीख ठरली; कुठे होणार सामना?

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी
2

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू Abhishek Porel अडचणीत! बलात्कार प्रकरणात जामीन रद्द; ३ दिवसांची पोलीस कोठडी

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण
3

Sourav Ganguly: सौरव गांगुली आणि पत्नी डोनाला जीवे मारण्याची धमकी! सतत पत्रांचा भडीमार, काय आहे प्रकरण

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…
4

ODI क्रिकेटचा ‘सुवर्ण’ अध्याय! ‘या’ दोन देशांनी पटकावला ५,००० व्या वनडे सामन्याचा मान; ५५ वर्षांपूर्वी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.