Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

महिला क्रिकेटपटूंना व्यावसायिक तसेच स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव मिळावा आणि त्यांना दर्जेदार सामन्यांचा सराव करता यावा, हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 19, 2026 | 05:01 PM
pune cricket competition

pune cricket competition

Follow Us
Follow Us:
  • हिंदवी वॉरियर्स करंडकासाठी महिला क्रिकेटपटू सज्ज
  • उद्यापासून फुरसुंगीत एकदिवसीय स्पर्धा
  • पुण्यातील १० महिला संघांचा सहभाग
पुणे: वॉरियर्स स्पोर्ट्सच्या वतीने ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ वरिष्ठ महिला आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत फुरसुंगी येथील वॉरियर्स क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. साखळी आणि बाद फेरी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत पुणे आणि परिसरातील महिला क्रिकेटचे १० संघ सहभागी होणार आहेत.या स्पर्धेबाबत माहिती देताना स्पर्धेचे संचालक स्वप्निल मोडक यांनी सांगितले की, गेल्या दशकभरात क्रिकेटमध्ये मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून पुण्यातही महिला क्रिकेटचा विस्तार होत आहे. पुण्यातील विविध क्लब आणि अकॅडमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला क्रिकेटपटूंना व्यावसायिक तसेच स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव मिळावा आणि त्यांना दर्जेदार सामन्यांचा सराव करता यावा, हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. एकदिवसीय प्रकारातील सामने खेळविण्यात येणार असल्याने महिला खेळाडूंना या माध्यमातून वेगळा अनुभव मिळेल, असा विश्वास मोडक यांनी व्यक्त केला.

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

 ५० षटकांचे २४ सामने

पांढऱ्या चेंडूवर खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण २४ सामने होणार आहेत. प्रत्येक सामना ५०-५० षटकांचा असणार आहे. त्यामुळे महिला क्रिकेटपटूंना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निमंत्रित सामन्यांसाठी आवश्यक असलेल्या एकदिवसीय क्रिकेटचा सराव मिळेल, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला ‘हिंदवी व्हेज हॉटेल’ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्पर्धेदरम्यान सहभागी खेळाडूंना सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण हिंदवी व्हेज हॉटेलच्या वतीने देण्यात येणार आहे.

१० संघांमध्ये विजेतेपदाची चुरस

स्पर्धेत वॉरियर्स अकॅडमी, रिक्रीएशन अकॅडमी, चांगभल क्रिकेट क्लब, अजित वाडेकर क्रिकेट अकॅडमी, एलिट क्रिकेट अकॅडमी, मॅव्हरीक्स क्रिकेट अकॅडमी, ओम साई अकॅडमी, गॅरी कर्स्टन अकॅडमी, डिलिजंट अकॅडमी आणि जोश-प्रो क्रिकेट अकॅडमी या दहा संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगणार आहे.

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

वैयक्तिक कामगिरीलाही पुरस्कार
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक, तर उपविजेत्या संघाला करंडक आणि पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि उदयोन्मुख खेळाडू यांना वैयक्तिक पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीर आणि ‘फायटर ऑफ द मॅच’ या पुरस्कारांमधून खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येणार आहे.

Web Title: Hindavi warriors league odi series pune for womens cricket sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार
1

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…
2

पुण्यात पोरं ऐकत नाहीत! Football कपमध्ये ‘या’ संघाचा थरारक विजय; अंडर-१६ गटात…

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण
3

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
4

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.